Dandiya has started playing in different parts of the city on the occasion of Navratri festival. Shocked children, youth participated in the dandiya. esakal
जळगाव

Navratri 2024 : जळगाव शहरात ‘दांडिया फिव्हर’; नवरात्रोत्सवात उत्साह शिगेला

Navratri : आदिमायेचा उत्सव शहरासह जिल्ह्यात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. सर्वच देवीच्या मंदिरांत देवीचा जागर, महाआरती, श्री सुक्त पठण होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आदिमायेचा उत्सव शहरासह जिल्ह्यात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे. सर्वच देवीच्या मंदिरांत देवीचा जागर, महाआरती, श्री सुक्त पठण होत आहे. विविध ठिकाणच्या देवींच्या मंदिरात दर्शनासाठी सायंकाळी रांगा लागत असल्याचे चित्र आहे. नवरात्रोत्सवात नवदुर्गा मंडळातर्फे दांडिया रास, गरबा नृत्यामुळे अधिक रंगत येत आहे. गेल्या गुरुवारी (ता. ३) नवरात्रोत्सव सुरू झाला. अनेक भाविकांच्या घरी घटस्थापनाही झाली. आदीशक्तीचा उत्सवामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. ( In city of Dandiya Fever got excited during Navratri festival )

देवीच्या आरत्यांनी शहरातील कालन्या, प्रभागात आसमंत भक्तीमय होत आहे. अनेक दुर्गात्सव मंडळांनी दांडीया, गरबा खेळण्यासाठी गोल रोषणाईचा मंडप उभारला आहे. सोबतच आकर्षक रोषणाई केल्याने एरवी अंधार असलेल्या उपनगरातील अनेक भाग रात्रीही उजेड दिसत आहे. नवरात्रोत्सवात युवक, युवतींच्या उत्साहाला उधाण येते. दांडिया, गरबा खेळताना त्याचा विशेष पेहराव केलेला असतो. दांडियाची गाणी, गरबा नृत्याने अनेक ठिकाणचे वातावरण जल्लोष होऊन जाते. अनेक दुर्गादेवी मंडळांनी दांडिया स्पर्धा ठेवल्याने युवक, युवतींमध्ये आपलाच दांडिया चांगला कसा हाेईल, यासाठी चढाओढ लागलेली दिसत आहे. (latest marathi news)

गरबा, दांडिया रास

शहरातील महापालिकेचे प्रांगण, शिवतीर्थ मैदान, खानदेश शॉपिंग कॉम्प्लेक्स यासह विविध कॉलन्या, उपनगरांमध्ये नवरात्रीनिमित्त गरबा, दांडिया रासचे आयोजन करण्यात आले आहे.

तिनशे मंडळांकडून देवीची स्थापना

जळगाव शहरात तिनशे सार्वजनिक मंडळांकडून देवीची स्थापना करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील इच्छादेवी, मायादेवी, भवानी माता यासह विविध मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रीनिमीत जिल्हा पोलिस दलातर्फे शहरातील मंडळांच्या ठिकाणी, मंदिरांजवळ पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi: अनेक हायप्रोफाईल हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचं नाव; प्रतिबंधित संघटनेशीही संबंध, पोलिस तपासात महत्त्वाची माहिती उघड

Nagpur News : फडणवीसांच्या संपत्तीत पाच वर्षांत फक्त ११ लाखांची वाढ; तर अमृता फडणवीस यांच्यावर आहे लाखोंचे कर्ज

Maharashtra Assembly Election 2024 : तिकीट वाटपाचा घोळ! पुणे शहरातील संघ भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये खलबत

Manoj Jarange Patil : केवळ २४ तासांत ८०० इच्छुकांच्या मुलाखती; मनोज जरांगे यांनी जाणून घेतली मते

Nana Patole: काँग्रेससाठी उद्या निर्णायक दिवस; दिल्लीतल्या CECच्या बैठकीनंतर नाना पटोले स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT