Fraud Crime esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : लाखाची नवरी हळद फिटण्यापूर्वीच फुर्रर्र; बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा प्रताप

Jalgaon Fraud : लग्नासाठी मुली मिळत नसल्याने एक लाख रुपये रोख नवरीला देऊन लग्न लावण्यात आले. अंगावर लाख रुपयांचे दागिने चढविले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : लग्नासाठी मुली मिळत नसल्याने एक लाख रुपये रोख नवरीला देऊन लग्न लावण्यात आले. अंगावर लाख रुपयांचे दागिने चढविले. तरसोद देवस्थानावर लग्नही लागले. रात्रभर नवरी घरी थांबली अन्‌ दिवस उजाडण्यापूर्वीच दागिने व रोकड घेऊन पसार झाल्याची घटना जळगावात घडली असून, शनिपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon incident of bride absconding with jewelry and cash)

अशाप्रकारचे गुन्हे छत्रपती संभागीनगर जिल्‍ह्यातही घडले असून, तीच टोळी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. महापालिकेत व्हॉलमॅन म्हणून नोकरीस असलेले शरद काशीनाथ चौधरी यांचा मुलगा मयूर याचे लग्न करायचे होते. त्याच्या लग्नासाठी मुलगी शोध होते. चौधरी कुटुंबीयांनी मुलाचा बायोडाटा तयार करून नातेवाइकांसह मित्रमंडळींमध्ये प्रसारित केला होता.

१३ फेब्रुवारीला चौधरी यांना पूजा विजय माने या ठगबाज महिलेचा फोन आला. तिने तुमच्या मुलाचा बायोडाटा आम्ही बघितला असून, आमच्याकडे मुलगी आहे. तुम्ही मेहकर (ता. बुलढाणा) येथे येऊन मुलगी बघून घ्या, असे सांगितले. त्यावरून ते मुलगी बघण्यासाठी गेले. मुलगी पसंत पडल्यानंतर पूजा माने यांनी त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली.

मात्र, चौधरी यांनी आम्ही एक लाख रुपये देण्यास तयार असल्याचे सांगत ते लग्नाच्या तयारीला लागले. लग्नाची खरेदी केल्यानंतर १६ मार्चला तरसोद येथील गणपती मंदिरात नातेवाइकांच्या उपस्थितीत मयूर चौधरी याचे नंदिनी गायकवाड हिच्यासोबत विवाह सोहळा पार पडला. या वेळी मुलीकडून पूजा माने, नंदिनीची मैत्रीण नीता अर्जुन गणवार, मावशी, मुलीचा मावसभाऊ हजर होते. लग्न आटोपल्यानंतर चौधरी यांनी पूजा माने हिला एक लाख रुपये दिले. (latest marathi news)

रात्रीतून नववधू पसार

लग्नकार्य आटोपल्यानंतर सायंकाळी सर्वजण घरी परतले. दिवसभराचा थकवा आल्यामुळे रात्री जेवण करून सर्वजण गाढ झोपले असताना, पहाटे नववधू नंदिनी व तिची मैत्रीण घरात दिसून आल्या नाहीत. त्यामुळे चौधरी कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. मात्र, त्या दोघीही मिळून आल्या नाहीत. पहाटे काळ्या रंगाच्या चारचाकीत बसून नववधू व तिच्या मैत्रीणीला जाताना पाहिल्याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने सांगितले.

दलालांचा फोन बंद

नववधूसह तिची मैत्रीण घरातून निघून गेल्याचे चौधरी यांनी पूजा माने यांना सांगितले असता, तिने शोध घेऊन सांगते, असे म्हणत मोबाईल बंद करून ठेवला. बरेच दिवस संपर्क होत नसल्याने चौधरी यांचे साडू रवींद्र चौधरी यांनी शिरूर येथे नववधूसह पूजा माने हिने नंदिनी हिचे वैजापूर तालुक्यातील तरुणासोबत विवाह लावून त्यांची फसवूणक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी (ता. २२) श्री. चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात लग्न जूळविणाऱ्या पूजा विजय माने (वय ३२, रा. महाडीक वाडी, सांगली), नववधू नंदिनी राजू गायकवाड (रा. आकोट फाईल, अकोला), तिची मैत्रीण नीता अर्जुन गणवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT