Dignitaries present at the felicitation of students. esakal
जळगाव

Jalgaon News : अभ्यासात सातत्य, ध्येयनिष्ठता, मोबाईल मुक्तता यशाची त्रिसूत्री : आयकर आयुक्त मकवाने

Jalgaon : ध्येयनिष्ठता आणि मोबाईल मुक्तता हे यशाचे खरे मार्ग असून, प्रत्येक जण विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आज मुलांपेक्षा मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. मुलांनीही करियरसाठी अभ्यासात सातत्य, ध्येयनिष्ठता आणि मोबाईल मुक्तता हे यशाचे खरे मार्ग असून, प्रत्येक जण विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडत आहेत. पण ती धडपड कशासाठी आहे, याचे उत्तर मात्र नाही. कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल तर ते पैसे कमविण्यासाठी नव्हे तर समाजाची सेवा करण्यासाठीच असले पाहिजे, असे मार्गदर्शन राज्याचे आयकर आयुक्त तथा शाळेचे माजी विद्यार्थी विशाल मकवाने यांनी पी. आर. हायस्कूल येथे केले. (Continuity in studies dedication mobile freedom are trinity of success)

शाळेच्या १९९७ च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचच्या वतीने दहावीच्या परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरूण कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते तर विशाल मकवाने, संस्थेचे सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारिया, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ व संयोजक गजानन साठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक डॉ. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वाचे व सामाजिक बांधिलकीचे त्यांनी कौतुक केले. दहावीच्या परीक्षेत केंद्रातून प्रथम आलेल्या कृष्णाली अरविंद शिंदे (९५ टक्के गुण), द्वितीय आलेल्या ईशा महेंद्रसिगं परिहार (९४.८०), तृतीय आलेल्या प्रांजल योगेश मिसर (९३.४०) या विद्यार्थिनींना अनुक्रमे ५०, ३० व २० ग्रॅम असे शंभर ग्रॅम चांदीचे पदक, सन्मान पत्र आणि ९० टक्के गुण मिळालेल्या २० विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देऊन आणि सीईटी परीक्षेत ९९ टक्के गुण मिळालेल्या राधिका राजपूत या विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (latest marathi news)

या वेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने पुढील आठवड्यात सेवानिवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य पोर्ट्रेट आणि ग्रंथसंपदा देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. एनसीसी अधिकारी डी. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. रवींद्र मराठे यांनी आभार मानले.

या वेळी या शैक्षणिक उपक्रमासाठी दातृत्व दाखविणारे १९९७ चे माजी विद्यार्थी विशाल मकवाने, प्रा. डॉ. रवींद्र मराठे, महेश सूर्यवंशी, रूपेश पाटील, दीपक केले, सागर कासार, ज्ञानेश्वर बाविस्कर, सम्राट धनगर, विनोद चौधरी, गोपाळ मराठे, सुधाकर फुलपगार, धीरज पवार, किरण सुतारे, सदाशिव पाटील, बिस्मिल्ला शेख, सुनील पाटील, सुशील कोठारी, भुषण मालपुरे या विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यशस्वितेसाठी ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ, कर्मचारी योगेश नाईक, प्रवीण तिवारी, जितेंद्र दाभाडे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT