jowar esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली!

Jalgaon : जिल्ह्यात दादर, ज्वारीची आवक मागील पंधरवड्यात आणखी वाढली आहे. दरावर दबाव कायम असून, कमाल दर २९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात दादर, ज्वारीची आवक मागील पंधरवड्यात आणखी वाढली आहे. दरावर दबाव कायम असून, कमाल दर २९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत. दर मागील हंगामाच्या तुलनेत कमी असून, यंदा दादर ज्वारी उत्पादकांचा हिरमोड झाला. मागील हंगामात दादर ज्वारीची आवक बऱ्यापैकी होती. परंतु दरात सतत सुधारणा झाली. कमाल दर ५४०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला होता. परंतु यंदा सुरुवातीपासून दर कमी आहेत. (Jalgaon Inflow of sorghum increased in district)

दरात घट झाली आहे. यंदा दादर ज्वारीची आवक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाली. या कालावधीत दादर ज्वारीचे दर कमाल ३३०० रुपये प्रतिक्विंटल होते. सध्या किमान २२५० व कमाल २९५० व सरासरी २४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दादर ज्वारीस आहे. आवक सर्वत्र बऱ्यापैकी आहे.

दादर ज्वारीसाठी जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, अमळनेर, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांत सध्या रोज मिळून सहा हजार क्विंटल दादर ज्वारीची आवक होत आहे. (latest marathi news)

यंदा अनेकांनी कृत्रिम जलसाठ्यांच्या आधारावर पेरणी केली होती. यामुळे यंदा दादर ज्वारीची पेरणी बऱ्यापैकी झाली. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी तापी, गिरणा, अनेर, पांझरा नदीच्या क्षेत्रात झाली होती. काळ्या कसदार जमिनीत दादर ज्वारीचे पीक जोमात आले आहे. ज्वारीची कापणी व मळणीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. एकाच वेळी कापणी व मळणीचे काम सुरू झाल्याने आवकही सध्या वाढली आहे.

जळगावात कोरडवाहू ज्वारी

चोपडा येथील बाजार समितीत बुधवारी (ता. २०) दादर ज्वारीची १२०० क्विंटल आवक झाली. तेथे किमान २२२५, कमाल २९३५ व सरासरी २४०० रुपये दर मिळाला. जळगाव बाजार समितीतही कमाल दर २९०० रुपये होता. कोरडवाहू दादरची आवक जळगावात अधिक होत आहे. या ज्वारीस चांगला उठाव असून, दरही मिळत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT