Increase in water storage of Anjani project  esakal
जळगाव

Jalgaon News : अंजनी प्रकल्पात पाण्याची आवक सुरू! शेतकऱ्यांत समाधान; एरंडोलसह परिसरातील नागरिक प्रकल्प पूर्ण भरण्याच्या प्रतीक्षेत

आल्हाद जोशी

एरंडोल : शहरासह ग्रामीण भागातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील पळासदड येथील अंजनी प्रकल्पात नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, हा प्रकल्प पूर्णपणे भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. म्हणून तालुक्यातील नागरिक जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहेत. (Jalgaon Inflow of water in Anjani Project)

अंजनी प्रकल्पातून एरंडोल शहरासह ग्रामीण भागातील कासोदा, धारागीर, जळू, नांदखुर्द, टोळी यांसह अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणगाव शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्यास याच प्रकल्पातून अंजनी नदीपात्रात पाणी सोडण्यात येते. अंजनी प्रकल्प परिसरात व अंजनी नदीच्या उगमस्थळाच्या परिसरात मागील आठ दिवसांपासून सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत आहे.

त्यामुळे या प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झालेली आहे. यापूर्वी पाच ते सहा वर्षांपूर्वी हा प्रकल्प पूर्णक्षमतेने भरला होता. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने अंजनी प्रकल्पात पुरेशा प्रमाणावर जलसाठा होऊ शकला नव्हता. प्रकल्पातील जलसाठा जवळपास संपुष्टात आल्यामुळेच एरंडोल शहरासह ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण झालेली होती.

सध्याच्या परिस्थितीत एरंडोल शहरात पाच ते सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे आपली तहान भागविण्यासाठी नागरिकांना पाण्याच्या शोधात वणवण फिरावे लागत आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पातील जलसाठा कमी झाल्याने प्रकल्पातून हजारो ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला. त्यामुळे जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ

होणार आहे. मागील आठ दिवसांपूर्वी या प्रकल्पात असलेल्या मृतसाठ्यातून शहरात पाणीपुरवठा करण्यात येत होता. मृतसाठ्यातील जलसाठा दुर्गंधीयुक्त व पिवळसर रंगाचा असल्याने नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पात मृतजलसाठ्यात वाढ होऊन सुमारे एक टक्का जलसाठा वाढला आहे. यावर्षी प्रकल्पातील गाळाचा मोठ्या प्रमाणावर उपसा करण्यात आल्याने प्रत्यक्षात जलसाठ्यात यापेक्षा जास्त वाढ झालेली आहे. पाण्याची आवक अशीच सुरू राहिल्यास जलसाठ्यात समाधानकारक वाढ होऊन नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळणार आहे. (latest marathi news)

जलसाठा शंभरटक्के होण्याचा विश्‍वास!

अंजनी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाल्यानंतर परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीतदेखील लक्षणीय वाढ होत असते. परंतु, हा प्रकल्प पूर्णक्षमतेने भरण्यासाठी सध्या जोरदार पावसाची गरज आहे. प्रकल्पात पूर्णक्षमतेने जलसाठा झाल्यास एरंडोल शहरासह ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर होत असते. शिवाय कालव्यांच्या माध्यमातून व काळ्या बंधाऱ्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तन सोडण्यात येते.

त्यामुळे शेतकरीदेखील प्रकल्पात पूर्णक्षमतेने जलसाठा होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस झालेले आहेत. प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात आणखीन जोरदार पाऊस झाल्यास प्रकल्पातील जलसाठा शंभरटक्के होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT