While inspecting the site of the proposed Unovation Center which is being realized from the concept of MLA Satyajit Tambe, Mr. Tambe esakal
जळगाव

Jalgaon News : जळगावसह धुळ्यात ‘युनोव्हेशन सेंटर’ लवकरच! तरुणांच्या उद्योजकतेला चालना; सत्यजित तांबेंकडून पाहणी

Jalgaon News : आमदार सत्यजित तांबे धुळे व जळगावच्या दौऱ्यावर आले असताना, युनोव्हेशन सेंटरच्या कामाची पाहणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : आमदार सत्यजित तांबे यांनी तरुणांच्या कल्पकतेला आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘युनोव्हेशन सेंटर’ ही संकल्पना आखली. विशेष म्हणजे राज्य शासनाने या संकल्पनेला मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्यांमध्ये युनोव्हेशन सेंटर उभारण्याचे काम सुरू झालेय. त्यादृष्टीने आमदार सत्यजित तांबे धुळे व जळगावच्या दौऱ्यावर आले असताना, युनोव्हेशन सेंटरच्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर युनोव्हेशन सेंटरच्या कामाला गती देऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश अभियंत्यांना दिले. (Innovation Center in Dhule along with Jalgaon)

युवकांना योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, त्यांच्या कल्पकतेला व उद्योजकतेला चालना मिळावी, या हेतूने आमदार सत्यजित तांबे यांनी युनोव्हेशन सेंटरची संकल्पना पावसाळी अधिवेशनात मांडली होती. विशेष म्हणजे या योजनेला राज्य सरकारने मंजुरी देत सुरवातीला उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये एक-एक युनोव्हेशन सेंटर उभारण्यासाठी निधी देऊ केला.

तीनशे जयहिंद ग्रुप

त्याच जोडीने उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये मिळून जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून छोट्या छोट्या क्लस्टर लेव्हलचे तीनशे जयहिंद यूथ क्लब उभारले जाणार आहेत. या यूथ क्लबमध्ये शिक्षण, उद्योजकता, नोकरी व जीवनावश्यक मूल्ये या बाबींवर जास्त भर दिला जाणार आहे.

हे यूथ क्लब जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या युनोव्हेशन सेंटरशी संलग्न असतील. ३०० पैकी ५० यूथ क्लबच्या उभारणीला मंजुरी मिळाली असून, त्यांच्या उभारणीचे काम सुरू झाल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. या युनोव्हेशन सेंटरच्या कामाचा आढावा घेऊन पुढे ही संकल्पना राज्यभरात राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (latest marathi news)

‘युनोव्हेशन सेंटर’चे स्वरूप असे

-तरुणांसाठी राज्य, देश, विदेशातील शिक्षण, व्यवसाय, करिअर, नोकरीची इत्थंभूत माहिती

-स्कॉलरशिप, विविध विद्यापीठ, अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया, करिअर गायडन्स आदींची माहिती

-सरकारी व खासगी क्षेत्रांतील नोकरीच्या संधी, स्पर्धा परीक्षेची माहिती

-नवउद्यमींसाठी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती. आर्थिक भांडवल कसे उभारायचे? व्यवसाय कसा सुरू करायचा? उद्योगधंद्यांतील खाचखळगे कसे ओळखायचे आदींबाबत मार्गदर्शन करण्यासोबतच कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम

-राजकीय व आर्थिक साक्षरता, आरोग्याची देखभाल यांसारखी चांगली जीवनमूल्ये अंगीकारण्याची आवड

-ग्रामीण युवकांना वाचनालय, अभ्यासिका, स्टार्ट-अप्ससाठी को-वर्किंग स्पेस आदी सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT