Raksha Khadse  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबद्दल प्रदेश भाजपकडून चौकशी; भाजपच्या अंतर्गत बैठकीतील कथित वाद

Jalgaon News : गेल्या आठवड्यात भाजपच्या जिल्हा बैठकीनंतर झालेल्या अंतर्गत बैठकीत खासदार रक्षा खडसे व कार्यकर्त्यामधील वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचा विषय प्रदेश भाजपने गांभीर्याने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : गेल्या आठवड्यात भाजपच्या जिल्हा बैठकीनंतर झालेल्या अंतर्गत बैठकीत खासदार रक्षा खडसे व कार्यकर्त्यामधील वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचा विषय प्रदेश भाजपने गांभीर्याने घेतला आहे. रक्षा खडसेंच्या उमेदवारीने मतदारसंघात नाराजीचा सूर याआधीच उमटून मंत्री गिरीश महाजनांनी त्यावर पडदाही टाकला. मात्र, तरीही हा व्हिडिओ आताच व्हायरल कसा झाला, कुणी केला? याबाबत प्रदेश भाजपने चौकशी सुरु केल्याचे वृत्त आहे. (Jalgaon Lok Sabha Election)

पक्षाच्या जिल्ह्यातील विशेषत: रावेर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली जात आहे. गिरीश महाजनांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्यानंतरही व्हिडिओ व्हायरल होणे योग्य नाही, असाही सूर यानिमित्ताने व्यक्त होत आहे. भाजपचे जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव अशा दोन्ही मतदारसंघातील उमेदवार दोन आठवड्यांपूर्वीच जाहीर झाले.

जळगावातून विद्यमान खासदार उन्मेश पाटलांना उमेदवारी नाकारुन स्मिता वाघ यांचे नाव निश्‍चित झाले, तर रावेरमधून खासदार रक्षा खडसेंनाच तिसऱ्यांदा संधी देण्यात आली. इकडे उन्मेश पाटलांचे समर्थक नाराज झालेत, तर रावेरला रक्षा खडसेंचे पक्षांतर्गत विरोधक चिडले. त्यांनी राजीनाम्याचे सत्र सुरु केले. त्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात पक्षाची जिल्हा बैठक जळगावातील ब्राह्मणसभेत पार पडली.

या बैठकीनंतर जी.एम. फाउंडेशनमध्ये स्थलांतरित झालेल्या भाजप कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अंतर्गत बैठक झाली. या बैठकीत वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे व रक्षा खडसे यांच्यात वाद झाला. रक्षा खडसे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरतात, आम्हाला विश्‍वासात घेत नाही, अशा तक्रारी काळेंनी महाजनांसमोरच केल्या. रक्षा खडसेंनी या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचा दावा केला. या वेळी आमदार मंगेश चव्हाण, राजूमामा भोळे, स्मिता वाघ आदी उपस्थित होते. (latest marathi news)

व्हिडिओ केला व्हायरल

बैठकीत कुणीतरी हा वाद सुरु असताना व्हिडिओ शूट केला. खरेतर ही पक्षाची अंतर्गत बैठक असताना हा व्हिडिओ कसा शूट केला, आणि आठवडा झाल्यानंतर का व्हायरल केला? याबाबत आता प्रश्‍न उपस्थित होत आहे. रक्षा खडसेंच्या उमेदवारीबद्दलची नाराजी लपून राहिलेली नाही. मात्र, जिल्हा बैठकीत महाजनांनी त्यासंबंधी स्पष्टीकरण देत सर्व पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर झाल्याचा दावा केला होता.

प्रदेशाकडून चौकशी

त्यानंतरही हा व्हिडिओ व्हायरल होणे प्रदेश भाजपने गांभीर्याने घेतले आहे. प्रदेश पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात रावेर मतदारसंघातील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विचारणा केली असून व्हिडिओ करणारा कोण, तो व्हायरल कुणी केला? याबाबत चौकशी केली जात आहे.

स्वत: रक्षा खडसेंनी अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल करण्यावर आक्षेप घेत त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचे समजते. त्यावरुन ही चौकशी सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री महाजनांशी यासंदर्भात चर्चा केल्याचेही काहींचे म्हणणे आहे. या प्रकरणात पुढे नेमके काय होते, हे लवकरच समजेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

SCROLL FOR NEXT