Inspector Baban will crime branch esakal
जळगाव

Jalgaon News : गुन्हे शाखेचे शिवधनुष्य पेलणार निरीक्षक बबन आव्हाड; चाचपणीसाठी अतिरिक्त कार्यभार

Jalgaon : जिल्हा पोलिस दलाची सर्वांत महत्त्वाची शाखा अर्थात स्थानिक गुन्हे शाखेचा Jalgaonअतिरिक्त पदभार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन अव्हाड यांना सोपविण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हा पोलिस दलाची सर्वांत महत्त्वाची शाखा अर्थात स्थानिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन अव्हाड यांना सोपविण्यात आला आहे. राजकीय मर्जी, वरिष्ठांचे आदेश आणि गुन्हे ‘डिटेक्शनचा रेशो’ कायम राखण्यासाठी गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांची साथ लाभली, तरच श्री. आव्हाड गुन्हे शाखेचा शिवधनुष्य यशस्वी पेलू शकतील. ( Inspector Baban Awad of MIDC Police Station has been given additional charge of Crime Branch )

श्री. आव्हाड यांच्या नियुक्तीने गुन्हे शाखेचा वचिंत गट सुखावला असून, प्रस्थापित गटांकडून रात्रीच्या गोल टेबलावर बैठका घेतल्या जात आहेत. गुन्हे शाखेसाठी अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तर काहींनी प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून मनाला लावून घेतले असताना, निरीक्षक बबन आव्हाड यांच्या हाती गुन्हे शाखेची धुरा आली आहे. अतिरिक्त पदभार असला, तरी त्यांनाच कायम नियुक्तीचे आदेशही मिळणार असल्याचे सांगण्यात येते.

‘शापित’ गुन्हे शाखा

गुन्हे शाखा ‘शापित’ शाखा, म्हणून आता ओळख बनवू पाहत आहे. दिवंगत पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणात तत्कालीन निरीक्षक प्रभाकर रायते यांना बदनामी झेलावी लागणे असो, की किरणकुमार बकाले यांच्या कार्यकाळाचे दोन महिने शिल्लक असताना, त्यांना बडतर्फीचे तोंड पाहणे असो. या दोन प्रकरणांमुळे बाहेरील जिल्ह्यातून येणारे आयपीएस अधिकारी असोत, की निरीक्षक असोत सर्वांनाच भीती वाटायला लागली आहे.

परिणामी, जळगाव जिल्ह्यात खमक्या अधिकाऱ्यांची कमतरता नेहमीपासूनच जाणवत आहे. पोलिस दलात आपली कारकीर्द गाजवलेले आणि नेहमीच सरळमार्गी पोलिसिंगसाठी प्रसिद्ध किशन नजन पाटील या उमदा अधिकाऱ्यास गुन्हे शाखेत भरणा असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांमुळे आपली ‘वाघ नखे’ कपाटात ठेवायची वेळ आली.

आव्हाडांकडे कार्यभार

गेल्या ३१ मेस किशन नजन पाटील निवृत्त झाल्यानंतर गुन्हे शाखेचा पदभार सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक निकम यांच्याकडे होता. मात्र, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी (ता. १२) सायंकाळी एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविला आहे.

शिवधनुष्य पेलवणार?

निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे कायम पदभार येणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी राजकीय मर्जी, वरिष्ठांचे आदेश, समकक्ष अधिकाऱ्यांशी समन्वय, मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रणासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे नियोजन आणि गुन्हे प्रकटीकरणाचा उच्चांकी दर कायम राखण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलवता येईल की नाही, हे येणारा काळच ठरवेल.

नव्याने मोट बांधावी लागणार

गावच्या सरपंचपदावर आरुढ होणारा व्यक्ती आपली कोअर टीमसोबत संपर्क ठेवत असतो. त्याशिवाय नियंत्रण व निर्णय घेणे अशक्य होते, हे सर्वश्रृत आहे. तोच नियम एलसीबीसारख्या महत्त्वाच्या शाखेलाही लागू होतो. अर्थात रेकॉर्ड ब्रेक कामगिरीची क्षमता असलेले कर्मचारीसोबत असल्याशिवाय निरीक्षक असो, की पोलिस अधीक्षक यांना काम करणे अशक्यच आहे.

असे असताना गुन्हे शाखेत बदलीपात्र (३०) कर्मचारी जाण्यापूर्वीच दुप्पट राजकीय कार्यकर्ते असलेल्या पोलिसांनी एलसीबीच्या कॉर्नरसीट तिकीट बुक केले आहे. नव्या दमाच्या कर्मचाऱ्यांनी एलसीबीचे स्वप्नच पाहू नये, अशी अवस्था असल्याने नवा अधिकारी, तरी एलसीबीसाठी टीमची मोठ बांधणार कशी, हा प्रश्‍न आहे.

एकसंघ टीम राखण्याची सर्कस

पोलिस दलात मनुष्यबळ कमी आणि इतकी कामे आहेत, की कधीच संपता संपणार नाहीत. गुन्हे शाखेत काम करताना पायात भिंगरी लावून सदैव धाव घ्यावी लागते. अशाही परिस्थितीत गुन्हे शाखेत गटतट निर्माण झाले आहेत. वर्षानुवर्षे ठरावीक लोकच काम करीत असल्याने त्यांनी आपआपली माणसे कसे सांभाळावी, याचे मंत्र शिकून घेतले आहे. परिणामी, नवख्या अधिकारी असो, की कर्मचारी ही मंडळी आपल्याच पद्धतीने गुन्हे शाखा चालवीत आहेत.

जो एकत नाही, त्याला मग बाहेरचा रस्ता धरावा लागतो. अनेक कर्मचाऱ्यांना टर्म पूर्ण होण्याआधीच या मंडळींनी गुन्हे शाखेतून रवाना केले आहे. इतकेच काय अधिकारी ऐकत नाही म्हटल्यावर त्याचाही ‘बकाले’ करण्याइतपत मजल कर्मचारी गाठू शकतात, म्हणूनच गुन्हे शाखेची सर्कस चालविण्यासाठी नाना घुगे, वाय. डी. पाटील, डी. डी. गवारे, राजेशसिंह चंदेल अशा खमक्या रिंगमास्टरची आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT