Crop Insurance esakal
जळगाव

Jalgaon Crop Insurance : विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार; अंबिया बहार फळपिकाचे नुकसान झालेल्यांना मिळणार लाभ

Crop Insurance : दोन वर्षांत अंबिया बहार फळपिकाचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

भडगाव : पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना अंबिया बहार सन २०२१-२२, २०२३- २०२४ या दोन वर्षांतर्गत कृषी आयुक्तालयाने केलेल्या शिफारसनुसार राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानपोटी ३४४ कोटी ६१ लाख ८७ हजार रुपये संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी कृषी आयुक्तांना उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचा लाभ २०२१-२२, २०२३- २०२४ या दोन वर्षांत अंबिया बहार फळपिकाचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. (insurance amount will be credited to farmers account )

त्यामुळे विम्याची उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रातून महिती घेऊन निकषांनुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. यासाठी येथील केळी उत्पादक शेतकरी संघाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम पाटील, विनोद पाटील व सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले होते.

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राज्यात सन २०२१ ते २४ या तीन वर्षांत राबविण्यात आली. ज्यात संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्षे (अ व ब), प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई आंबिया बहार या नऊ फळपिकांचा समावेश होता. राज्यातील ३० जिल्ह्यांच्या महसूल मंडळात ही योजना राबविण्यात आली. या योजनेत आंबिया बहार २०२१ ते २४ या वर्षांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीने मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदान वितरीत करण्याची कृषी आयुक्तालयाने मागणी केली होती. (latest marathi news)

त्यानुसार, सन २०२१-२०२२ साठी २ लाख ७९ हजार ३९१ रुपये व २०२३-२०२४ साठी ३४४ कोटी ५९ लाख ८ हजार २४५ रुपये असा एकूण ३४४ कोटी ६१ लाख ८७ हजार रुपये इतकी निधी वितरीत करण्यास शासन विचाराधीन होते. यावर राज्य शासनाने २४ सप्टेंबरला निर्णय घेऊन कृषी आयुक्तालयाने केलेली शिफारसनुसार राज्य हिस्साची रक्कम रक्कम संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी कृषी आयुक्तांना उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. त्याचा संबंधित पात्र शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

निकष काय आहेत?

एप्रिल महिन्यात सलग पाच दिवस तापमान ४२ अंशांपेक्षा व मे महिन्यात सलग पाच दिवस तापमान ४५ अंशांपेक्षा जादा असणे अपेक्षित आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात सलग पाच दिवस तापमान ८ अंशाच्या खाली असणे अपेक्षित आहे. तसेच जून, जुलै महिन्यात ४० किलोमीटर प्रती वेगाच्या वाऱ्याने फळपिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जातो, अशी माहिती विमा कंपनीचे प्रतिनिधी विष्णू खेडकर यांनी दिली.

''राज्य शासनाने विमा कंपनीला राज्याच्या हिस्स्याची रक्कम दिल्याने शेतकऱ्यांची मागील वर्षाच्या खरीप हंगाम नुकसाची उर्वरित रक्कम लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे.''- किशोर पाटील, आमदार ः पाचोरा-भडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : सातारा महामार्गावरील खांबटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT