Talking to 'Sakaal' Pranita Gaikwad, Chief Adjudicator of the District Hospital, Jayashree Jogi, Assistant of the Emergency Department etc. esakal
जळगाव

SAKAL Samvad: रुग्णसेवेत ‘ईश्‍वर पाहणाऱ्या ‘परिचारिका’; जिल्हा शासकीय रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत ‘नारीशक्ती’शी संवाद

SAKAL Samvad : चोवीस तास जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) परिचारिका (नर्स) कार्यरत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोणताही रुग्ण असो त्याला काही आजार असल्याशिवाय तो रुग्णालयात दाखल होत नाही. त्याची ती व्याधी बरी होऊन तो सुखरूप घरी जावा, तो निरागी राहावा, यासाठी चोवीस तास जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) परिचारिका (नर्स) कार्यरत आहेत. स्वतःचे दुःख, कौटुंबिक अडचणी, विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळत ‘रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा’ असे ब्रीद यशस्वी करीत आहेत. (Interaction with Narishakti working in District Government Hospital Medical College Nurse who sees God in patient care )

रुग्ण कोणताही व्याधीचा असो त्याच्यावर उपचार करीत, त्याला त्याला खंबीरपणे रोगाला सामोरे जा, निरोगी राहा, असा संदेश जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिचारिकांनी ‘सकाळ’ने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित संवादात दिला. ‘कोरोना’ काळातही जीवाची पर्वा न करता, कोरोनाग्रस्तांना सेवा दिल्याने अनेकांना आधार मिळत ते बरे झाल्याचे परिचारिका सांगतात.

परिचारिकांच्या पाठीशी खंबीर

प्रणिता गायकवाड (मुख्य अधिसेविका, जीएमसी) : पूर्वीचे जिल्हा रुग्णालय व आताचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मी विविध पदांवर काम केले आहे. नर्सिंग महाविद्यालयात ट्यूटर म्हणून कार्यरत होते. नंतर बारा वर्ष प्रिंसिपॉल होते. वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांच्या विविध ठिकाणी ड्यूटी लावणे, सर्व वॉर्डात परिचारिका, इन्चार्ज यांच्या वेळा ठरवून देणे, त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेता, सुट्या, रजांचे नियोजन करणे, वरिष्ठांनी दिलेल्या सूचना परिचारिका, इन्चार्ज यांच्यापर्यंत पोचविणे, त्यांचे पालन होते की नाही, ते पाहणे अशी जबाबदार आहे. ‘जीएमसी’ झाल्यापासून वरिष्ठांसोबत दररोज बैठकीसाठी जावे लागते. नर्सिंग स्टाफ चांगल्या रितीने काम करतो. कोरोनातही त्यांनी चांगले कार्य केले आहे, आताही चांगल्या रुग्ण सेवा देताहेत. त्यांच्या पाठीशी खंबीर आहे.

नारीशक्तीच्या रुपात रुग्णांची सेवा

जयश्री जोगी (परिसेविका, आपत्कालीन विभाग) : जिल्हा रुग्णालयाच्या अनेक विभागात मी काम केले आहे. अनेक वर्ष आपत्कालीन विभागात सेवा दिली. आता परिसेविका (इन्चार्ज) आहे. या विभागात येणारा रुग्ण अतिशय गंभीर स्थितीत येतो. त्याला योग्य प्रकारे सेवा देतो. कोरोना काळात भीतीचे वातावरण होतो. स्वत:ला सांभाळत रुग्णसेवा करायची होती. मात्र न भीता योग्य काळजी घेत सेवा दिली. कुटुंब, मुलांचे शिक्षण, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत रुग्ण सेवा करताना कसरत होते. मात्र, आत्मसमाधान मिळते. आम्हाला चोवीस तास अलर्ट राहावे लागते. देवीप्रमाणे महिलांना नारीशक्तीचे रुप म्हणतात. देवीच आमच्याकडून रुग्णसेवा करून घेते, असे वाटते. (latest marathi news)

आपुलकीची वागणूक

संगीता शिंदे (परिसेविका, बाह्य रुग्ण, वॉर्ड क्रमांक) : दररोज येणाऱ्या रुग्णांना नर्सिंग सेवा देते. जिल्हा रुग्णालय असणाऱ्या रोज तपासणीसाठी येणारे रुग्ण वाढले आहेत. अनेक रुग्ण ग्रामीण भागातून येतात. त्यांना आपुलकीची वागणूक देते. नोकरी असल्याने घरची कामे व नोकरी करताना तांराबळ उडते. मात्र नोकरीत समाधानही मिळते.

रुग्ण बरा होण्यासाठी प्रयत्न

सुरेखा महाजन (परिसेविका, सर्जिकल वॉर्ड क्रमांक सात) : विविध प्रकारच्या आजाराचे रुग्ण तीन ते सात दिवसांसाठी या वॉर्डात दाखल होतात. जेवढे दिवस असतात तेवढे दिवस त्यांना सेवा दिली जाते. ते लवकर बरे व्हावेत, यासाठी आमचा प्रयत्न असतो.

महिलांना मैत्रीपूर्ण सेवा

यशोदा जोशी (परिसेविका, महिला कक्ष, वॉर्ड क्रमांक दहा) : माझ्या वॉर्डात महिला रुग्ण अधिक असतात. विविध आजारांवर उपचारासाठी त्या आलेल्या असतात. महिला रुग्ण असल्याने त्यांना लवकर समजून त्यांना ज्याप्रमाणे नर्सिंग सेवा दिली जाते. महिला असल्याने त्यांना मैत्रीपूर्ण सेवा देतो. अनेकवेळा सुटीच्या दिवशी घरची कामे सोडून ट्यूटीवर यावे लागते.

रुग्णांचे समुपदेशन महत्त्वाचे

ज्योती ओतारी (परिसेविका, वॉर्ड क्रमांक १३) : रुग्णालयात आलेला रुग्ण लवकर बरा होऊन घरी जावा, यासाठी त्यावर उपचार केले जातात. अनेक रुग्ण औषधोपचार घेताना पथ्य पळताना दिसत नाही. त्यांना पथ्य पाळण्याबाबत समुपदेशन करते. काही रुग्ण ऐकतात, त्यामुळे लवकर बरे होऊन घरी जातात.

रुग्णालयात रांगा, तरीही सेवाभाव

कविता पवार (परिसेविका, बाह्य रुग्ण विभाग) : रोज तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असते. त्यांना डाक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नर्सिंग सेवा देते. सकाळी आठपासून दुपारपर्यंत गर्दी असते. गर्दी असली तरी सर्वांना नर्सिंगचे उपचार केले जातात. काही रुग्ण घाई करतात. गर्दीत आपला क्रमांक अगोदर लागला पाहिजे, अशी अपेक्षा असते.

बाल रुग्णांची मुलांप्रमाणे काळजी

श्रद्धा सपकाळ (प्रभारी परिसेविका, बाल रुग्ण, आयसीयू) : क्रिटिकल बालके या वाॅर्डात दाखल होतात. बालकांवर उपचार करताना त्यांचे पालक आम्हाला बाळाला पाहू द्या, भेटू द्या, असे सांगतात. मात्र, पालकांनी संयम पाळला पाहिजे. ‘आयसीयू’तील बाळाला किटाणूपासून दूर ठेवावे लागते. बाल रुग्णांची काळजी दक्षतेने घेतली जाते.

महिलांना मैत्रिणीसारखी वागणूक

रेखा कुंभार (परिसेविका, प्रसूती कक्ष) : प्रसूती कक्षात बहुतांश बाळंत होण्यासाठी महिला रुग्ण येतात. प्रसूती कळासह इतर त्रास होतो. अशा महिला रुग्णांना मैत्रीण म्हणून सेवा दिली जाते. प्रसूतीवेळी आम्ही परिचारिका त्या महिलेजवळ असल्याने तिला काय केल्याने तिची लवकर प्रसूती होईल, याची काळजी घेत असतो. महिला बाळंत होणे म्हणजे तिचा पूर्नजन्मच असतो. हा आनंद महिला रुग्णांना देण्यासाठी आमची सेवा आहे.

...यांनीही साधला संवाद

‘सकाळ’च्या संवाद कार्यक्रमांत निशा गाढे (प्रभारी परिसेविका, नेत्रकक्ष), मयुरी सोनवणे (प्रभारी परिसेविका कज्युलटी विभाग), रूपाली पाटील (प्रभारी परिसेविका, आयसीयू), कविता साळी (प्रभारी परिसेविका, एफएसडब्लयू आर्थो), तुळसा माळी (प्रभारी परिसेविका, शस्त्रक्रिया थिएटर विभाग), आशा पाटील (पीएचएन-फमिली प्लनिंग डिपार्टमेंट, मेट्रन आफीस) यांनीही आपल्या कार्याबद्दल माहिती देत अनुभव कथन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

Waris Pathan: वारिस पठाण पत्रकार परिषद सुरु असतानाच ढसाढसा रडले, म्हणाले, सगळेच माझ्या मागे हात धुवून मागे लागले अन...

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

SCROLL FOR NEXT