MP Unmesh Patil esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यात उद्योगासाठी 1200 कोटीची गुंतवणूक : खासदार उन्मेश पाटील

Jalgaon News : जळगाव शहरासह तालुक्यातील औद्योगिक वसाहतींसाठी २६ उद्योजकांनी तब्बल बाराशे कोटीचे सामंजस्य गुंतवणूक करार केले आहेत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव शहरासह तालुक्यातील औद्योगिक वसाहतींसाठी २६ उद्योजकांनी तब्बल बाराशे कोटीचे सामंजस्य गुंतवणूक करार केले आहेत. त्यामुळे तब्बल तीन हजार सहाशे युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Jalgaon Investment of 1200 crore for industry in district marathi News)

जिल्हा उद्योग केंद्रांच्या माध्यमातून आज हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे जिल्हास्तरीय गुतंवणूक परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला राज्यासह जिल्ह्यातील स्थानिक उद्योजकही उपस्थित होते. याबाबत खासदार उन्मेश पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक आर.आर.पाटील, प्रकल्प व्यवस्थापक दिनेश गवई, समन्वयक समीर भाटीया, उदयोग निरिक्षक शरद लासूरकर उपस्थित होते.

तीन हजारांवर रोजगार

सामजंस्य करारात मोठ्या उद्योजकासह स्थानिक उद्योजकांनीही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. जळगाव, चाळीसगाव, पाळधी, बोदवड, भुसावळ, जामनेर, पाचोरा या ठिकाणी उद्योग उभारणी करण्यात येणार आहे. ॲग्रो, केमिकल, कॉटन, इंजिनिअरिंग क्षेत्रातील उद्योग आहेत. यामुळे जिल्ह्यात तब्बल ३६०० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

सर्वांत महत्वाचे म्हणजे गुजरात अम्बुजा एक्सपोर्टची तब्बल ३६६ कोटी रूपयांची गुंतवणूक चाळीसगाव औद्यौगिक वसाहतीत करण्यात आली आहे. या औदयौगिक गुंतवणूक करारासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनवर्सन मंत्री अनील पाटील यांचेही सहकार्य लाभले.

पाचोरा, जामनेर, बोदवड कॉरिडोर

जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, बोदवड हे लवकरच इंडस्ट्रीअल कॉरिडोर उभारण्यात येणार असल्याची माहितीही खासदार पाटील यांनी दिली. पाचोरा ते जामनेर रेल्वेचे ब्रॉडगेज विद्युतीकरण करण्यात येत आहे. बोदवडपर्यंत ही रेल्वे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मालवाहतूक करणे सोयीस्कर होणार असून पाचोरा, जामनेर, बोदवड असा इंडस्ट्रीअल कॉरिडोर होणार आहे. (Latest Marathi News)

खादेशातील उद्योजकांना सवलतीत वीज

उद्योजकांना वीज पुरवठा करण्याच्या बाबतीत बोलतांना खासदार पाटील म्हणाले, विदर्भ, मराठावाडा येथील उद्योजकांना सवलतीच्या दरात विज पुरवठा करण्यात येतो, त्याच पद्धतीने आता खानदेशातील उद्योजकांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याबाबत सहमती दर्शविली असून लवकरच ती सवलत उपलब्ध होणार आहे.

साजंजस्य करार झालेल्या कंपन्या

गुजरात अंबुजा एक्सपोर्ट (ब्रिजमोहन चितलंगे)३६० कोटी, मे. हरिश मुंदडा (हरीश मुंदडा)१७० कोटी, कैलास ॲग्रो इंडस्ट्रीज (कैलास सूर्यवंशी) १३० कोटी, स्पेक्ट्रम ईलेक्ट्रीक (दीपक चौधरी) १०० कोटी, संयोग बायोक्लीन (भूषण सोनवणे) ७० कोटी, क्लॅएक्स पिगमेंट (निमीश भालचंद्र पाटील) ४० कोटी, जी ब्रम्हहाजी होमटेक्स (धनराज कासट) ३५ कोटी, प्रभंजन ऑटोमोबाईल्स (आदित्य जाखेटे) ३० कोटी, विनले कंटेनर (श्रीमती अंकिता संचेती) २६ कोटी, अमित इरिगेशन (अमित भारंबे) २२ कोटी, श्रध्दा वेनचर्स (महेंद्र ग्यानचंद रायसोनी) २० कोटी, मे. देवकर यार्न फॅब्रीक्स (प्रितेश गोपालराव देवकर) २० कोटी, मेरीको लिमीटेड (प्रितम रॉंड्रीग्स) १८.२४ कोटी, बालाजी सीडस् (पराग शांतीलाल सुरतवाला)१८ कोटी, मे.आरएमसी फरफॉमसन्स केमीकल्स (जयवंत धर्माधिकारी ), १८ कोटी, मे.पार्क रिटेल मार्केटींग (अशिषकुमार प्रवीणभाई पटेल) १२ कोटी, एच.डी. फायर प्रोटेक्ट (सुधीर एकनाथ पाटील ) ११ कोटी, आर.एस. इंडस्ट्रीज (राकेश निंबा वाणी) ११ कोटी, अमर डेअरी (प्रमोद खत्री) १० कोटी, मे. निर्मल ॲग्रो (निखील संजय राणे), १० कोटी, मे.एम.एन.ॲग्रो (निलेश सुरतवाला) १० कोटी, डेक्कन ईरिगेशन (श्रीमती सोनल गढरी) १० कोटी, मे.गोहिल ॲग्रो (अभय गोहिल) १० कोटी, जोगेश्‍वरी जिनींग (प्रतीक राजेश भाटीया) ७ कोटी, महावीर कॉटन (राजेंद्र केशव पाटील) ७ कोटी, वेगा केमिकल्स (अंकित भालचंद्र पाटील ) ५ कोटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT