Scientist and President of Nobel Foundation Jaideep Patil and dignitaries along with meritorious students of Nobel Science Talent Search Examination at PSLV Centre.  esakal
जळगाव

Jalgaon News: ‘इस्त्रो’च्या अभ्यास सफरीने भावी शास्त्रज्ञ प्रभावित! अंतराळाबद्दल माहिती घेतली; नोबेल- जैन फाउंडेशनचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चांद्रयान-३ च्या यशानंतर सामान्य भारतीयांमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोबद्दल मोठ्या प्रमाणात कुतूहल निर्माण झाले आहे. यात विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ६४ विद्यार्थ्यांनी नुकतीच भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला भेट दिली. (ISRO study trip impressed future scientists learned about space)

नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था आणि भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दरवर्षी महाराष्ट्रात नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा घेतली जाते. यातील गुणवंत विद्यार्थ्यांना (इस्रो), विक्रम साराभाई स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (गांधीनगर), सायन सिटी यासारख्या उच्च तंत्रज्ञान संस्थांना विनामूल्य भेटीसाठी नेले जाते.

‘इस्त्रो’ दौऱ्याची सप्तपदी

२०२३ मध्ये या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या महाराष्ट्रातील ६४ विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा नुकताच झाला. विद्यार्थ्यांच्या इस्रो दौऱ्याचे हे सातवे पर्व होते. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी या प्रकारची चळवळ राबविणारी नोबेल फाउंडेशन ही एकमेव संस्था आहे. (latest marathi news)

निरीक्षण आणि अभ्यास

या तीनदिवसीय अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी विक्रम साराभाई स्पेस ॲप्लिकेशन सेंटरमध्ये उपग्रह बनविण्याच्या पद्धती, उपग्रहांचे प्रकार, रॉकेटचे प्रकार, उपग्रह पाठविण्यासाठी रॉकेटच्या इंधनांचा अभ्यास मंगळयान, चंद्रयान, तसेच भविष्यात आखणी केलेल्या गगनयानसंदर्भात संपूर्ण मॉडेल्स तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला, तसेच गांधीनगरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग या व्यासपीठावर आयआयटीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून माहिती घेतली. गांधीनगरच्या आयआयटीत अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. देशातील अत्याधुनिक परम संगणक मुलांनी अभ्यासले.

या ठिकाणीही भेट

अहमदाबाद येथील सायन्स सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी आशिया खंडातील एक प्रगत रोबोटिक पार्कसमध्ये रोबोटतर्फे होणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्यपद्धतीचा प्रात्यक्षिकांसह अभ्यास समजून घेतला. यासह भारतातील अद्ययावत तंत्रज्ञान आधारित मत्स्यालय व स्पेस पार्कला भेट दिली. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ परेश सराईया, जयदीप पाटील, अतुल देव, तुषार पाटील, रामचंद्र पाटील, राजेंद्र पाटील, आरती पाटील उपस्थित होते. सर्व यशवंत विद्यार्थी व आयोजकांचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, कुलगुरू डॉ. व्ही. एल.माहेश्वरी आदींनी अभिनंदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT