Traffic of private vehicles and passengers parked in the bus stand area. esakal
जळगाव

Jamner MSRTC Depot : जामनेर बसस्थानकाला अतिक्रमणांंचा विळखा, अपघाताचा धोका; पिण्याच्या पाण्याची असुविधा

MSRTC Depot : बस आगार बीओटी तत्त्वावर बांधण्यात आले आहे. बसस्थानकात काही वर्षांपूर्वी पाणपोई बांधण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

प्रल्हाद सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

जामनेर : येथील बस आगार बीओटी तत्त्वावर बांधण्यात आले आहे. बसस्थानकात काही वर्षांपूर्वी पाणपोई बांधण्यात आली होती. मात्र ती बंद आहे. बसस्थानक परिसरात कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने तहान भागविण्यासाठी प्रवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. बसस्थानकातून पुणे, नंदुरबार, सुरत, धुळे, संभाजीनगर, मालेगाव या लांब पल्ल्यासह साधारणपणे ग्रामीण भागात ६२० फेऱ्या होतात. त्यातून शाळकरी विद्यार्थ्यांसह सुमारे ४० हजार प्रवासी प्रवास करतात. ( Jamner bus stand encroachment danger of accidents for passenger )

बसस्थानक परिसरात जागेची कमतरता भासत असून, खासगी दुचाकी व चारचाकी वाहने बसस्थानकाच्या आवारात लावलेली असतात. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याने बसगाड्यांना स्थानकात ये- जा करताना अनेक अडचणी येत आहेत. शिक्षणाची पंढरी म्हणून जामनेर शहराची ओळख आहे. जळगाव विभागातील जामनेर बसस्थानकात नेहमीच प्रवासी व विद्यार्थ्यांची वर्दळ असते.

आगारातून ८० बसेसच्या माध्यमातून एकूण ६२० फेऱ्या ग्रामीण भागात ये-जा करीत असतात. विद्यार्थ्यांसह प्रवासी संख्या सुमारे ४० हजार असून, अद्ययावत प्रसाधनगृह, वेळापत्रकानुसार फेऱ्या, चालक वाहक आराम कक्षाची नवीन बसस्थानकात निर्मिती केली आहे. सद्यस्थितीला बसस्थानकाचे काम अपूर्ण असून, महामंडळाच्या ताब्यात आलेले नाही.

दरम्यान, सध्या असलेल्या बसस्थानकात पाणी, पार्किंग, स्वच्छतागृह आदी प्रश्‍नांसह सणासुदीच्या काळात बसस्थानकात योग्य त्या सुरक्षेबाबत उपाययोजना होत नसल्याने बऱ्याचदा प्रवाशांचे दागिने व इतर साहित्य चोरीचे प्रकार होत असतात. पोलिस सुरक्षा नसल्याने टवाळखोरांकडून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आवश्यक ती उपायोजना बसस्थानक परिसरात करण्याची आवश्यकता आहे. (latest marathi news)

''जामनेर आगारातील बसस्थानक हे सर्व सुविधांनी नियुक्त आहे. तसेच आगारातील नूतनीकरणाचे काम सुरू आहे. आगारातला मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रात उत्पन्नात व नफ्यात अव्वल स्थानावर आहे. आगाराला वाहनांची आणखी पूर्तता केल्यास प्रवासी वाहतूक आणखी चांगल्या प्रकारे करण्यासाठी आगारात चांगला प्रयत्न करू शकतो. २०२२ २३ या आर्थिक वर्षात आगाराला एक कोटी १८ लाख निवळ नफा खर्च वजा जाता झाला आहे.''- गोपाल वाघ, बसस्थानक प्रमुख

''बसस्थानक परिसरात पिण्याच्या पाणी व्यवस्था नाही. प्रवाशांना पाण्यासाठी भयकंती करावी लागते. बसगाड्यांची स्थिती दयनीय आहे. परिसरात अतिक्रमणाचा विळखा आहे. प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आगार प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी.''- पंढरीनाथ पाटील, प्रवासी पाइंटर

..या आहेत समस्या

- बसस्थानक परिसरात अतिक्रमणे

- पिण्याच्या पाण्याची नसल्याने गैरसोय

- बहुतांश बसगाड्यांची स्थिती खिळखिळी

- पोलिस सुरक्षा वाऱ्यावर

- प्रवाशांना टवाळखोरांचा त्रास

- प्रसाधनगृहासह परिसरात अस्वच्छता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT