Assembly Inspector Gokul Borse speaking at the Congress party meeting. Neighbor Adv. Sandeep Patil, Shantaram Patil etc. esakal
जळगाव

Jalgaon News : पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम प्रामाणिकपणे करा : विधानसभा निरीक्षक बोरसे

Jalgaon : राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात २०१४ मध्ये एकवाक्यता न झाल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात २०१४ मध्ये एकवाक्यता न झाल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यावेळी प्रदेश काँग्रेसने दिलेल्या आदेशाप्रमाणे चोपडा विधानसभा मतदारसंघ हा ऐन वेळी काँग्रेसकडे आल्याने पक्षाचे नुकसान झाले. २०१४ सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास पक्ष सज्ज असावा म्हणून पक्षाने तयारी सुरू केली आहे. राज्यात सर्व २८८ जागांवर उमेदवार देण्याची पक्षाची तयारी आहे. (job honesty of candidate party will give Vidhan Sabha Inspector Borse )

यानुसार चोपडा विधानसभा मतदारसंघात दोन सक्षम उमेदवारांची निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे बैठकीत दिसून आले असून, पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम प्रामाणिकपणे करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना प्रदेश काँग्रेसकडून नियुक्त चोपडा विधानसभा निरीक्षक गोकूळ बोरसे यांनी केले. चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने येथे नुकतीच चोपडा विधानसभा निवडणूक चर्चा व उमेदवार चाचपणी संदर्भात चोपडा विधानसभा निरीक्षक गोकूळ बोरसे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील अध्यक्षस्थानी तर व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, माजी जिल्हा सदस्य मासूम तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब रातू बारेला व माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कोळी आदी उपस्थित होते. माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील म्हणाले, की गतकाळात राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. (latest marathi news)

मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभव झाल्याने ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, ही जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी बैठकीत केली आहे. या प्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सांगोरे, माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, माजी शहराध्यक्ष के. डी. चौधरी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष हमीद तडवी.

लासूरचे उपसरपंच अनिल पाटील, बाजार समिती संचालक डॉ. अनिल पाटील चोसाका संचालक शिवाजी पाटील, गोपाल धनगर, शरद धनगर, सूतगिरणी संचालक ॲड. एस. डी. पाटील, देविदास सोनवणे, राजेंद्र पाटील, सुनील बागुले, वजाहत अली काजी, शेतकी संघाचे संचालक बाळकृष्ण पाटील, देविदास धनगर, डॉ. बी. आर. पाटील, आरिफ सिद्दिकी, किसान सेलचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे, चेतन बाविस्कर मोहन देवराम पाटील, भिका पाटील, डॉ. पराग पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित तू थोडक्यात वाचलास.. वाकून नमस्कार करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांचा मिश्किल टोला

दाऊदने मला जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून...; Lalit Modi यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, शाहरुख खान...

TRAI New Rules : मोठी बातमी! 1 डिसेंबरपासून OTP बंद होणार? ग्राहकांचा फायदा की नुकसान, नेमकं प्रकरण वाचा

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : नाना पटोले यांनी दिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT