Officials of Mahavikas Aghadi protesting in front of the Collectorate on Wednesday. esakal
जळगाव

Jalgaon News : ज्वारी खरेदी सुरू करावी, दूधाला दर मिळावा; महाविकास आघाडीचे धरणे सुरू, ‘शंभर खोके..एकदम ओके’चा नारा’

Jalgaon News : शेतकऱ्यांनी श्री. पाटील यांच्या ‘लाव रे... तो व्हिडिओ’ उपक्रमाचे कौतुक केले. महाविकास आघाडीतर्फे राज्य सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर झालेले अनुदान कुठलेही निकष न लावता सरसरकट सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करावे, शासनाने ज्वारी खरेदी केंद्र सुरू केले. मात्र, त्यांचा लक्षांक कमी असल्याने शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी होत नाही. ज्वारी साठविण्यासाठी गुदाम उपलब्ध नसल्याने ज्वारी खरेदी होऊ शकत नाही, असे उत्तर बळीराजाला मिळत असल्याने तत्काळ सरसकट ज्वारी खरेदी सुरू करावी आदी मागण्यांसाठी महाविकास आघाडीने बुधवार (ता. १०)पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. (jowar should purchased milk should get price Maha Vikas Aghadi protest continues)

शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख डॉ. हर्शल माने, जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, उपजिल्हा प्रमुख दशरथ महाजन, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर जयश्री महाजन, माजी खासदार उन्मेष पाटील, पाचोऱ्याच्या वैशाली सूर्यवंशी, गजानन मालपुरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, वाल्मीक पाटील, कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

दूधाला ३० रुपये प्रतिलिटर भाव, पाच रुपये प्रतिलिटरचा फरक तत्काळ सर्व शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना देण्यात यावा. मागील कालावधीत जळगाव सहकारी दूध उत्पादक संघामार्फत सादर न झालेल्या प्रस्तावांनाही पाच रुपये लिटरचे अनुदान मंजूर करावे. जिल्ह्यातील ६ हजार ६८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीकविमा नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली आहे.

याबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंतिम अधिकार असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पीकविमा तक्रार निवारण समितीने मंजुरी देऊनही राज्य सरकारने शेतकऱ्यांवर केलेल्या अन्यायाबाबत दखल घेऊन तत्काळ नुकसान भरपाई मंजूर करावी आदी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितले. (latest marathi news)

पन्नास खोके... एकदम ओके...

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात ‘पन्नास खोके... एकदम ओके’चे नारे दिले. खोकेबाज मंत्र्यांचे करायचे काय? खाली डोके वर पाय, असा घोषणांनी परिसर दणाणला होता.

लाव रे... तो व्हिडिओ

मनोगत व्यक्त करताना माजी खासदार पाटील यांनी दुग्ध विकास मंत्री विखे-पाटील, पीकविम्याबाबत मंत्री धनंजय मुंडे, भावांतर योजनेबाबत देवेंद्र फडणवीस, ज्वारी खरेदी केंद्रांबाबत ‘ॲग्रोवन’मध्ये आलेल्या बातम्यांची कात्रण एलईडी स्क्रीनवर दाखवत आंदोलनाला वेगळ्या उंचीवर नेले. शेतकऱ्यांनी श्री. पाटील यांच्या ‘लाव रे... तो व्हिडिओ’ उपक्रमाचे कौतुक केले. महाविकास आघाडीतर्फे राज्य सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT