The waterfall in Satpura, A scaffold is erected to watch animals in the forest esakal
जळगाव

Jalgaon Jungle Safari : सातपुडयांच्या जंगलात साकारतेय प्रती ‘ताडोबा‘; एप्रिलमध्ये सुरू होणार ‘सफारी’

Jalgaon Jungle Safari : सातपुडा पर्वतातील वाघ, बिबटे, हरणासह सुकी धरण, मचाण, त्रिवेणी धबधबा, अवणी सरंक्षणकुटी, माकडदरी धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Jungle Safari : सातपुडा पर्वतातील वाघ, बिबटे, हरणासह सुकी धरण, मचाण, त्रिवेणी धबधबा, अवणी सरंक्षणकुटी, माकडदरी धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. मात्र आता सर्वसामान्य पर्यटकांना ते सहसा पाहता येत नाही. मात्र आता सातपुड्यातीलल नैसर्गिक सौंदर्यासह जंगलची सफारी वनविभागाद्वारे सर्वसामान्य नागरिकांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुली करण्यात येणार आहे. ‘सातपुडा नेचर सफारी’ अंतर्गत ही सफारी होणार आहे. (Jalgaon Jungle safari in Satpura will be conducted by forest department in month of April)

सातपुड्यातील ५० ते ६० युवकांना याबाबत प्रशिक्षण दिले गेले असून त्यांनाच पर्यटकांना या सफारीत ने-आण करण्यास सांगितले जाणार आहे. यामुळे या भागातील युवकांना रोजगाराच्या संधी होणार आहे. सकाळी व सायंकाळी सूर्योदय व सूर्यास्तासारखे क्षण यावेळी पाहता येतील. परदेशातील अनेक पक्षी या परिसरातील नदी, धबधब्यामध्ये स्थलांतर करून येतात. अंडी घालतात. नंतर काही काळाने परत निघून जातात. यामुळे पक्षीप्रेमींची याठिकाणी गर्दी असते.

पाच कोटींचा प्रस्ताव

जंगल सफारीच्या मार्गावर रस्ते तयार करणे, पाणवठे तयार करणे, मचाण तयार करणे आदी सुविधा देण्यासाठी पाच कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यापैकी दीड कोटींचा निधी उपलब्ध झाला असून सुविधा उभारण्यास सुरुवात झाली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केलेल्या पाल (ता. रावेर) सातपुडा जंगल सफारीत अस्वल, ससा, मोर, रानडुक्कर, बिबट्याचे मार्क आढळले होते.

सातपुडा जंगल सफारीला गारबडीं रोपवाटिकेपासून सुरवात होईल. पुढे सुकी धरण, मचाण, त्रिवेणी धबधबा, अवणी सरंक्षणकुटी, माकडदरी धबधबा या परिसर पहाता येईल. २७ किलोमीटर अंतरात आतापर्यंत बिबट, अस्वल, मोर, रानडुक्कर, निलगाय, सांबर, चिकांरा, हरिण, सर्पगरूड, अजगर, तडस, कोल्हा, लांडगा या प्राणी पाहता येतील. (latest marathi news)

असा असेल प्रवास

पाल व सातपुडा पर्वतातील २७ किलोमीटरचा हा परिसर जंगल सफारीसाठी निश्‍चीत केला आहे. वन विभागाचा कंपार्टमंट क्रमांक २४-२५ यासाठी आहे. हा परिसर फिरण्यासाठी अडीच ते तास लागतील. गारबडीं रोपवाटिकेपासून सुरूवात होईल. सफारीसाठी सहा सिटर वाहनाची व्यवस्था वन व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात येईल.

पर्यटकांना सोबत गाईड दिला जाईल. वाहनांचा एक ट्रीपचा खर्च (सहा जणांचा) अडीच हजार ते तीन हजार असेल. या उत्पन्नातून युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. जो निधी शिल्लक राहील तो पाल गावाच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे. जंगल पाहण्याची अनेकांची इच्छा असते. पण नियमांमुळे अनेकदा जंगल सफर करणे शक्य होत नाही. पण आता हो सुविधा वन विभाग पाल (ता. रावेर) येथे सुरू करणार आहे. त्यातून स्थानिकांना रोजगार देखील मिळेल

"मी ताडोबा अभयारण्यात कार्यरत असताना ताडोबा सफारीचा अनुभव होता. पालच्या सातपुड्यात अशी सफारी सूरू करता येईल याचा विचार करून तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यांनी मंजुरी दिली. पायाभूत सुविधांचे काम सध्या सुरू आहे. एप्रिलमध्ये ही सफारी सुरू होईल."- जमीर शेख, उपवनसंरक्षक, यावल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT