अडावद (ता.चोपडा) : चोपडा तालुक्यातील कमळगाव ते मितावली या रस्त्यावरील पुलाचा भराव मूसळदार पावसामुळे वाहुन गेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर धावणाऱ्या बससह इतरही प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची ये-जा थांबली आहे. त्यामुळे बसगाड्याही येत नसल्याने शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. (Jalgaon Kamalgaon Mitavali road washed away Hit by heavy rains)
येथून जवळच असलेल्या कमळगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात मितावली येथून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करतात. दरम्यान, काल सोमवारी (ता.१५) रात्री झालेल्या मूसळधार पावसामुळे येथील कमळगाव ते मितावली या रस्त्यावरील नाल्यावर आजुबाजुला संरक्षण भित्त नसल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे हा रस्ता वाहून गेला. त्यामुळे मितावली या गावावरून येणारे
विद्यार्थी कमळगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात येऊ शकले नाहीत. हा नाल्यावरील रस्ता पूर्णपणे वाहुन गेला आहे. त्यामुळे मितावली ते कमळगाव मार्गावील एसटी बसदेखील येऊ शकत नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे.
कमळगाव ते मितावली या रस्त्याचे नुकतेच म्हणजे गेल्या मार्च, एप्रिल व मे या महिन्यांत डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात रस्त्याचे तीनतेरा वाजलेले दिसून येत आहेत. कारण कमळगाव ते मितावली या रस्त्यावरील नाल्यावर आजूबाजुला सरंक्षण भिंत नसल्याने हा रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. (latest marathi news)
या रस्त्यावरून मितावली, पुनगाव, जळगाव येथून प्रवासी येतात. शिवाय चांदसणी येथील काळभैरव नाथाचे येथे भव्य मंदिरदेखील आहे. जागृत असलेल्या या देवस्थानात परिसरातील भाविकदेखील मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. पण हा रस्ता वाहून गेल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणशत हाल होत आहेत. सोबतच मितावलीचे विद्यार्थी अडीच किलोमीटर अंतर पायपीट करून शाळेत शिक्षणासाठी ये-जा करीत आहेत.
वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज!
मुसळधार पावसामुळे कमळगाव-मितावली हा रस्ताच वाहून गेल्याने रस्ता बनविणाऱ्या ठेकेदाराच्या कामाचा दर्जा कसा होता, हे यावरून आता स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे याबाबत आता बांधकाम विभागातील संबंधित वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणीदेखील कमळगाव-मितावली गावांसह भागातील विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, वाहनधारक व प्रवाशांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.