Jalgaon KBCNMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल हे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेशी निगडित असल्यामुळे ३० दिवसांच्या आत निकाल लागावेत यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळातील सर्व विभाग आणि महाविद्यालये यांनी सामुहिक जबाबदारी स्वीकारून काम करावे असे आवाहन कुलगुरू प्रा.व्ही. एल. माहेश्वरी यांनी केले. (Jalgaon KBCNMU Result of all department will be out within 30 june news)
दरम्यान २९ परीक्षांचे निकाल २० दिवसांच्या आत जाहीर करण्यात विद्यापीठाला यश प्राप्त झाले असून ८२% उत्तरपत्रिका मूल्यमापनाचे काम पूर्ण झाले आहे. ३० जूनपर्यंत विद्यापीठातर्गंत सर्व विभागाचे निकाल घोषित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी बुधवारी (ता.१४) परीक्षा विभागातील अधिकारी तसेच संगणक विभागातील कर्मचारी यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विद्यापीठाचे निकाल मुदतीच्या आत लागावेत यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वयाची गरज असल्याचे सांगितले. कुलपती तथा राज्यपाल यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी मुदतीच्या आत निकाल सर्व विद्यापीठांनी जाहीर करावेत.
कोणत्याही अडचणी सांगू नयेत अशा सूचना सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीत दिल्या असल्यामुळे यापुढे मुदतीच्या आत निकाल लावण्याची जबाबदारी परीक्षा विभाग आणि सर्व महाविद्यालयांनी सामूहिकपणे पार पाडणे गरजेचे आहे.
निकालांना कोणत्याही प्रकारे विलंब होऊ नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अथवा त्यांची ससेहोलपट होऊ नये याची काळजी घेण्यात यावी अशा सूचनाही कुलगुरूंनी या बैठकीत दिल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम वेळेत व्हावे यासाठी सर्व प्राध्यापकांना पत्र लिहून आवाहन केले आहे. पाच वेळा ऑनलाइन बैठका घेण्यात आल्या. अभ्यासमंडळांच्या बैठकांमध्ये सूचना देण्यात आल्या. शिवाय प्राचार्यांच्या बैठकीत आणि पत्र लिहून प्राध्यापकांना मूल्यमापनात सहभागी होण्याच्या सूचना द्याव्यात असे निर्देश दिले आहेत.
आपण व प्र-कुलगुरू यांनी मूल्यमापन केंद्रांना भेटी दिल्या आहेत. या सर्व कारणांमुळे मूल्यमापनाचे काम वेगाने होत आहे अशी माहिती प्रा. माहेश्वरी यांनी दिली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. दीपक दलाल यांनी प्रास्ताविक केले. प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते. डॉ. मुनाफ शेख यांनी आभार मानले.
विद्यापीठाने विविध विद्याशाखांच्या २९ अभ्यासक्रमांच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल २० दिवसांच्या आत जाहीर केले आहेत. यामध्ये डीपीए, बीए (अॅडिशनल म्युझिक), एम.एङ (द्वितीय वर्ष), एम. ए. उपयोजित भूगोल द्वितीय वर्ष, एम. एस्सी. उपयोजित भूगोल द्वितीय वर्ष, एम.एस्सी.बायोटेक द्वितीय वर्ष, एम. एस्सी.
पर्यावरणशास्त्र द्वितीय वर्ष, एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी द्वितीय वर्ष, एम. एस्सी. एनर्जी स्टडीज द्वितीय वर्ष, एम. एस्सी. मटेरिअल सायन्स द्वितीय वर्ष, एम. ए. डॉ. आंबेडकर थॉटस, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, स्त्री अभ्यास, इंग्रजी, हिंदी, मराठी (सर्व द्वितीय वर्ष), बी. कॉम. प्रथम वर्ष, बी.एस.डब्ल्यू. प्रथम वर्ष, वृत्तपत्र पदविका,
एम.ए. जनसंवाद आणि पत्रकारिता दोन्ही वर्ष, बी.लिब., एम.ए. संरक्षणशास्त्र, मानसशास्त्र व संगीत (दोन्ही वर्ष), एम.लिब. या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दरम्यान ३ लाख ७० हजारांपेक्षा अधिक उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण झाले असून हे प्रमाण ८२% आहे. ३० जूनच्या आत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर होतील अशी आशा प्रा.दीपक दलाल यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.