farmer Sowing esakal
जळगाव

Jalgaon News: भडगाव तालुक्यात खरीपाची लगबग सुरू! 10 हजार हेक्टरवर होणार कापूस लागवड; चांगल्या उत्पन्नासाठी पावसाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

भडगाव : तालुक्यात दहा हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड करण्यात आली आहे. मान्सूनच्या सऱ्या कोसळल्याने मक्याच्या लागवडीला सुरूवात झाली आहे. ठिबक सिंचनाने कमी पाण्यात पीक घेता येत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांचा ठिबक सिंचनाकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमुजर सध्या खरीप हंगामात व्यस्त आहेत. (Jalgaon Kharif season begins in Bhadgaon taluka)

सद्यः स्थितीत कापसासह इतर पिकांच्या लागवडीत शेतमजुरांसह शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. तब्बल दहा हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षाचा कापसू भाववाढीच्या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवलेला आहे. घरात कापूस पडून असतानाही पुन्हा शेतात कापूस लागवड सुरु असल्याचे चित्र दिसत आहे.

बियाणांसाठी शेतकरी रडकुंडीला

कपाशी बीटी- टू वाणाची मूळ किंमत ८६० रुपये आहे. मात्र मुख्य विक्रेते एक हजार ते बाराशे रुपयांना तर काही ठिकाणी पंधराशे रुपये दराने प्रती पॅकेट विक्री झाल्याचे दिसून आले. बागायती कापसाच्या बियाणे खरेदी करताना शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला आहे. याशिवाय ‘लिंकीग’ देखील करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना नाइलाजाने ते खरेदी करावे लागत आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी पी. के. बागले यांच्याशी संपर्क साधला असता, कपाशी बियाणाची काळ्या बाजारात विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे संबंधित दुकानदाराची तक्रार करावी. संबंधित विक्रेत्यावर कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले. (latest marathi news)

दहा हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस

मागीलवर्षी भडगाव तालुक्यात एकूण २३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी भडगाव तालुक्यात कापूस पिकाची लागवड एकूण २३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित आहे. यात बागायती कापूस लागवड ९ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर तर जिरायती कापूस लागवड १४ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित आहे.

कापूस हे नगदी पीक असल्याने भडगाव तालुक्यात दरवर्षी कापसाची सर्वाधिक लागवड होते. मागीलवर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीसह पावसाचा फटका बसल्याने कापूस उत्पन्नात घट झाली होती. कापसाचा भाव साडेसात हजारांच्या वर गेलाच नाही.

बहुतांश शेतकऱ्यांना साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल अशा कमी भावाने कापूस विक्री करावा लागला. तर बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस भाव वाढीच्या आशेने आजही घरात पडून आहे. असे असले तरी यावर्षीही खरीप हंगामात कापूस पिकाची लागवड सर्वाधिक होण्याची चिन्हे आहेत.

दमदार पावसाकडे नजरा

मान्सूनच्या सऱ्या तालुक्यात कोसळल्या. मात्र, तेवढ्या त्या दमदार नसल्याने शेतकरी अद्यापही त्यावर पेरणी करताना दिसत नाही. मात्र, काही शेतकऱ्यांनी कापूस आणि मक्याच्या लागवडीला सुरवात केली आहे. उन्हाळी कापूस लागवडीला हा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे. मात्र, शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. ‘चुआ’वर जतन करण्यात शेतकरी या पावसामुळे खुश दिसून येत आहे. कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.

"शेतकरी बांधवानी ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. पावसाने जमिनीत पुरेशी ओल होणे आवश्यक आहे."

- पी. के. बागले, तालुका कृषी अधिकारी, भडगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT