Jalgaon Kharif Season : तालुक्यात खरीप पिकांसाठी शेती शिवार पेरणीपूर्व मशागतीने तयार झाले असून, २४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्रात पेरणीसाठी उद्दिष्ट कृषी विभागाकडून देण्यात आले आहे तर ३३ हजार ४८२.१४ मेट्रिक टन उत्पादन येण्याची अपेक्षा आहे. तालुक्यात बियाण्यांची मुबलकता आहे तर जुलैपर्यंत खते पुरतील एवठा साठा आहे. तालुक्यात शेतकऱ्यांनी शेतीची खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. (Pre sowing cultivation in Raver taluka speed up seeds fertilizers abundant )
रावेर तालुक्यात ५० हजार ९२५ हेक्टर क्षेत्र पेरणीलायक क्षेत्र आहे. मागील वर्षी २४ हजार ९६९ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली होती. यात २४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्र उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर केळी, हळद, भाजीपाला, फळबाग इतर पिकांचा समावेश आहे.
उत्पादनवाढीची अपेक्षा
रावेर तालुक्यात खरीप पिके व कापूस यांच्यासह २४ हजार ९६९ हेक्टर क्षेत्रावर उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यानुसार ३३ हजार ४८२ मेट्रिक टन उत्पादनाची अपेक्षा आहे. यात पीकनिहाय कंसात उद्दिष्ट व उत्पादन अपेक्षा मेट्रिक टनमध्ये अशी ज्वारी (२४५०) ५७९६.७०, बाजरी (१००) १२०, मका (२१५०) ७०९५, तूर (७५०) ६१८.७५, मूग (४५०) १७९.७३, उडिद (९८०) ४६२.५६, भुईगूग (६०) ५६.१०, सोयाबीन (७००) १०५०, कापूस (१७,०४५) १८,१०४, एकूण खरीप पीक हेक्टर क्षेत्र (२०,६८५) एकूण उत्पादन अपेक्षा ३३ हजार ४८२.१४ मेट्रिक टन धान्य उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे.
बियाणे, खते मुबलक
रावेर तालुक्यात बियाण्यांची मुबलक उपलब्धता आहे. जुलैपर्यंत खते पुरतील एवढा खतांचा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही बियाण्यांची व खतांची टंचाई नाही. युरिया ३ हजार ८४० मेट्रिक टन व १०/२६/२६ १०,४३७ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती कृषी अधिकारी यांनी दिली. (latest marathi news)
पीक विमा
तालुक्यात मागील वर्षी ४ हजार ५८९ शेतकऱ्यांनी ४ हजार १५८ हेक्टर क्षेत्रात विमा काढला होता. यावर्षी खरीप हंगामासाठी ऑगस्टपर्यंत पीकविमा शेतकऱ्यांना काढता येईल.
३६ कोटींचे कर्ज वाटप
तालुक्यात एप्रिल व मे अशा दोन महिन्यात जिल्हा बँकेने ४ हजार २०० शेतकऱ्यांना ३ हजार ७०४ हेक्टर क्षेत्रासाठी ३६ कोटी ५७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून तालुक्याला सेंद्रिय शेतीसाठी ५०० हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार कृषी विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे.
पशुंचे लसीकरण पूर्णत्वाकडे
पावसाळ्यात पशुंना लाळ खुरकत, लंपी, घटसर्प, फऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे पशुंना या रोगांच्या निर्मुलनासाठी पशुंना लसींचे लसीकरण करण्यात येते. तालुक्यात ५६ हजार पशुधन आहेत. आतापर्यंत लाळ खुरकतचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लंपीचे लसीकरण ९८ टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती पशुचिकित्सालय रावेरचे सहायक आयुक्त डॉ. एस. डी. धांडे यांनी दिली.
''शेतकऱ्यांनी शेतीत रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवून हिरवळी खतांचा वापर करावा व शेतीची सुपीकता वाढवावी. लिंबोळी अर्काचा वापर करावा. बीज प्रक्रियेचा वापर करावा.''- भाऊसाहेब वाळके, कृषी अधिकारी, रावेर तालुका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.