Officers, Headmaster and teaching staff while accepting the 'Sunder School' award from Group Education Officer Shailesh Dakhne. esakal
जळगाव

Jalgaon News : ‘सुंदर शाळा’ अभियानात खिर्डीचे पाटील विद्यालय तृतीय!

CM Majhi Shala Sundar Shala : शाळेला एक लाखाच्या धनादेशाचे बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन रावेर येथील गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे व मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

खिर्डी (ता. रावेर) : दी रुरल एज्युकेशन सोसायटी संचालित अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय व ‘ह. ल. पाटील कनिष्ठ महाविद्यालय’ शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या राज्य शासनाच्या अभियानात तिसरा क्रमांक प्राप्त केला. शाळेला एक लाखाच्या धनादेशाचे बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन रावेर येथील गटशिक्षणाधिकारी शैलेश दखणे व मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. (Khirdis Patil Vidyalaya third in Majhi Shala Sundar Shala)

या वेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. हे बक्षीस घेण्यासाठी संस्थेचे सचिव टी. एल. पाटील, मुख्याध्यापक कीर्ती महाजन, पर्यवेक्षक पी. पी. देहाडे यांनी हे बक्षीस स्वीकारले.

एक वर्षाच्या काळात शाळेने उच्चस्तरीय समितीने नेमणूक नियमावलीवरून दिलेल्या सूचनेप्रमाणे आरोग्य, आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास, तंबाखूमुक्त, प्लास्टिकमुक्त शाळा, पोषण आहार, तसेच लोकसहभागातून केलेली शाळेची कामे या निकषाच्या आधारे शाळेने शंभर टक्के सौंदर्य कसे होईल, तसेच विद्यार्थी उपक्रम, विकासात्मक गुणवत्ता, व्यक्तिमत्व विकास,अशा अनेक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन शाळेला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. शाळेला तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, चेअरमन व सर्व संस्थाचालकांनी शाळेचे कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT