Bodwad MSRTC Depot esakal
जळगाव

Bodwad MSRTC Depot : कचऱ्याचे ढीग अन अस्वच्छतेचा कळस; बोदवड बसस्थानकात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांचा अभाव

MSRTC Depot : बसस्थानक परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, बसस्थानकाच्या मागील व समोरील बाजूस घाणीचे साम्राज्य आहे.

अमोल अमोदकर

बोदवड : येथील बसस्थानक हे मुक्ताईनगर आगारात येते. बसस्थानकाची जागा एक एकरच्या जवळपास आहे. मात्र अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्याने बसस्थानक अर्धा एकर पण जागेवर आहे की नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. बसस्थानक परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता, बसस्थानकाच्या मागील व समोरील बाजूस घाणीचे साम्राज्य आहे. बोदवड तालुक्यात ५२ खेडे लागून आहे. परंतु तालुक्यात बसफेऱ्या या एक किंवा दोनच वेळा होतात. (Lack of drinking water and toilet at Bodwad bus stand )

मागील काळात चिखली, मेहकर, नाशिक, अकोला अशा लांब पल्ल्याच्या गाड्या येथून सुटत होत्या. मात्र कोरोना झाल्यापासून भरपूर लांब पल्ल्याच्या गाड्या बंद झाल्या आहेत. सायंकाळी सातपासून बोदवड येथे मुक्ताईनगर, जामनेर, भुसावळ, मलकापूर येथून येण्या जाण्यासाठी गाडी नाही. भुसावळ किवा मलकापूर येथे रेल्वे मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना रात्री गावात येण्याची व्यवस्था ही खासगी करावी लागते.

तसेच जळगाव येथून दोनच गाड्या बोदवडसाठी असतात. बसस्थानक परिसरात खासगी गाड्या मोठ्या प्रमाणात लावलेल्या असतात. परिसरात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, पण त्यात पाणीच येत नाही. स्वच्छतागृहाला घाणीने वेढले आहे. यामुळे महिला व विद्यार्थी स्वच्छतागृहाचा वापर करणे टाळतात. पाणी कधी असते तर कधी नसते.

प्रवासी सुरक्षेचा बोजवारा

बसस्थानकात प्रवासी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण यंत्रणा सुरू नाही. याचा फायदा घेत बसस्थानक परिसरात भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे प्रवासी महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी, पोत लंपास करणे, पाकिटमारी असे प्रकार नित्याचेच झाले आहे. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचा मोठा त्रास आहे.

रात्री सातला शेवटच्या गाडीने येणाऱ्या प्रवाशांना ग्रामीण भागात बस नसल्याने निवासाची व्यवस्था बसस्थानकात करण्यात आली पाहिजे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी प्रवासी संघटना अध्यक्ष सुरेश वर्मा यांनी वेळोवेळी बसची मागणी केली आहे, तेही अपयशी ठरले. बसस्थानकात ये-जा करणाऱ्या बस मोठ्या प्रमाणात जुन्या, भंगार झाल्या आहेत. नवीन गाड्या देण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत असते. (latest marathi news)

स्थानकातून अशा होतात बसफेऱ्या

बोदवड बसस्थानकात नऊ बसेस मुक्कामी असतात. अर्थात चालक-वाहक असे १८ कर्मचारी हे बससोबत मुक्कामी असतात. त्यांना झोपण्याची अथवा सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. येथील बसस्थानकावरून मुक्ताईनगर आगाराच्या २१ बसेस जामनेर आगाराच्या १५, भुसावळ आगाराच्या १६, मलकापूर आगाराच्या ९ बसेस ये-जा करतात. अशा एकूण ३५२ फेऱ्या बसच्या फेऱ्या होतात. इतर आगारातून जळगावच्या २ बस, बुलढाणा १, एरंडोेल १, विठ्ठलवाडी १ अशा बसगाड्या येतात.

''ग्रामीण भागात अनेकदा बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. बोदवड स्थानकातून लांब पल्ल्याच्या फारशा बस नाहीत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बसस्थानक अपूर्ण पडते.'' - बिहारी आहुजा, प्रवासी संघटना, तालुकाध्यक्ष

''खासगी गाड्या वाहतूक तसेच दुचाकी पार्किंगपासून त्रस्त आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून, पोलिस ठाण्याकडे पत्र पाठविले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस बसस्थानकात असावे स्वच्छालय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी हि मागणी आहे.''- सुमेरसिंग पाटील, वाहतूक नियंत्रक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT