Jalgaon News : राजकारणात जिल्ह्याची परिपक्व पाठशाळा, ऐतिहासिक वारसा लाभलेले, राष्ट्रीय महामार्गावर वसलेले, तर धार्मिक अधिष्ठान असलेले शहर अशी पारोळा शहराची जिल्ह्यात सर्वत्र ओळख आहे. मात्र, आजवर शहरात औद्योगिक वसाहत नसलेला पारोळा तालुका आजदेखील वसाहतीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तरी लोकप्रतिनिधींसह सर्वांनीच यासाठी सक्रीय पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ( Lack of industrial estate in Parole )
पारोळा शहरात मेडिकल, कापड, फटाका फॅक्टरी, मॉल, हॉटेल याच ठिकाणी बेरोजगार युवक रोजंदारीने काम करीत आपल्या कुटुंबाला हातभार लावतानाचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यातच आज शहरात बांधकाम या व्यवसायात तब्बल शेकडो बिगारी व कारागीर आत्मनिर्भरपणे काम करीत आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झालेली दिसून येत आहे. शहरातील युवकांना हाताला काम नाही.
त्यामुळे भाजीपाला विक्री, फळविक्री यातून ते रोजगार उपलब्ध करीत आहेत. त्यातच अनेक युवकांना बांधकाम व्यवसायात काम करण्याचा रस असल्याने अनेक युवक बिगारीतून कारागीर झालेले आहेत. त्यामुळे बांधकाम व बिगारी कारागारांना समाधानकारक रोजगार मिळत असल्यामुळे शहरातील शेकडो युवक या व्यवसायाकडे वळलेले दिसत आहेत. (latest marathi news)
यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शहरातील अनेक बांधकामे रखडली होते. मात्र, कालांतराने लोखंड सिमेंटचे भाव कमी झाले. त्यामुळे पुन्हा इमारत बांधकामांना वेग आल्याचे दिसून येते. त्यामुळे आठवडाभर काम करीत दर रविवारी कारागीर व बिगारी यांना बांधकाम ठेकेदार कामाचा मोबदला देतो. त्यामुळे ते याबाबत समाधानी दिसत आहेत.
अनेक युवक गुजरातकडे!
पारोळा शहरातील अनेक युवकांनी उच्चशिक्षण घेतले. मात्र, मध्यमवर्गीय परिस्थिती असल्याने पुढील शिक्षण व मार्गदर्शनाचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे अनेक युवक गुजरातमध्ये गेलेले आहेत. त्या ठिकाणी कारखान्यावर काम करून ते आपल्या कुटुंबीयांना हातभार लावत आहेत. दरम्यान, शहराच्या नवीन वसाहती यांनी बांधकामात वेग घेतला आहे.
त्यामुळे या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आलेले आहेत. मात्र, नवीन वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक कामे रेंगाळली आहेत. या कामाच्या माध्यमातून दैनंदिन पाचशे ते सातशे रुपये रोजंदारी मिळते. त्यामुळे अनेक युवक बांधकामाकडे आपोआप वळले आहेत. उपेक्षित असलेला बांधकाम कारागीर व बिगारी वर्गाकडे अधिक लक्ष देऊन या वर्गाला दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.