Judge Praveen Yadav and the parties and lawyers from both sides while discussing with Reva Bendale who came by rickshaw in the Lok Adalat. esakal
जळगाव

Jalgaon Lok Adalat : जमिनीचा 50 वर्षांपासूनचा वाद अखेर मिटला तडजोडीने

Jalgaon News : तब्बल पन्नास वर्षांपासूनचा प्रलंबित जमिनीचा वाद अखेर सामंजस्यातून तडजोडीने येथे शनिवारी (ता. २७) झालेल्या लोकअदालतीत मिटला.

सकाळ वृत्तसेवा

रावेर : तब्बल पन्नास वर्षांपासूनचा प्रलंबित जमिनीचा वाद अखेर सामंजस्यातून तडजोडीने येथे शनिवारी (ता. २७) झालेल्या लोकअदालतीत मिटला. येथील न्यायालयात राष्ट्रीय महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत अनेक आपापसातील वादविवाद तसेच विविध शासकीय आस्थापना यांच्या विवादित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. (Jalgaon Lok Adalat)

या अदालतीत मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती प्रवीण यादव यांनी भूमिका बजावली. रेवा दामू बेंडाळे (रा. विवरे बुद्रुक) यांच्यासह वगैरे १३ जणांनी मिळून प्रतिवादी शरद धोंडू तळेकर यांच्याविरुद्ध रावेर न्यायालयामध्ये १५ मार्च १९७४ ला दाखल केला होता. यावर विविध प्रकारचे वाद प्रतिवाद होत हा दावा उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. परंतु तरीही दोन्ही पक्ष न्यायाच्या प्रतीक्षेत होते.

लोकन्यायालयात वादीतर्फे ॲड. संदीप भंगाळे व प्रतिवादीतर्फे ॲड. जितेंद्र दांडगे यांनी काम पहिले. दरम्यान, हा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी तयार केले. ही बाबही न्यायमूर्ती श्री. यादव यांच्या समक्ष आल्यानंतर दोन्ही पक्षाचे पक्षकार तसेच वादी प्रतिवादी आणि वकील यांचे कौतुक करीत प्रत्यक्ष दोघांची बाजू समजावून घेऊन खात्री करून हा वाद निकाली काढण्याचे आदेश दिले. निकालानंतर पन्नास वर्षांपासून हिरमुसलेले चेहरे हास्याने खुलले होते. ॲड. भंगाळे, श्री. दांडगे, व सहकारी ॲड. सुवर्णा रावेरकर यांनी पुढाकार घेतला.

८३ प्रकरणे निकाली

येथील लोकन्यायालयात ८३ प्रकरणे निकालात काढण्यात आले असून, ३७ लाख ५६ हजार १८३ इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. या प्रकरणी न्यायालयातील अधीक्षक श्री. बिराडे, श्री. इंगळे, श्री. बारी, श्री. ढिवरे यांनी न्यायालयीन प्रक्रियेचे कामकाज पाहिले. तर ॲड. व्ही. पी. महाजन, विपिन गडे. (latest marathi news)

योगेश गजरे, सुभाष धुंदले, प्रमोद बिचवे, तुषार चौधरी, बार संघाचे उपाध्यक्ष डी. ई. पाटील, सचिव किशोर पाटील, सहसचिव जावेद शेख, सरकारी वकील श्रीकृष्ण दुट्टे, जितेंद्र दांडगे, नितीन चौधरी, सुवर्णा रावेरकर, दीपक निळे, दीपक गाढे आदी उपस्थित होते.

...अन् उपस्थितही भारावले

जमिनीच्या वादावरून वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये सुरू असलेला तब्बल पन्नास वर्षांपासूनचा वाद अखेर लोकन्यायालयात दोन्ही पक्षकारांच्या सामंजस्य भूमिकेने वकिलांच्या प्रयत्नाने संपुष्टात आला आहे. न्यायमूर्ती श्री. यादव यांनी दोन्ही पक्षकारांच्या भूमिका समजावून घेऊन हा वाद निकाली काढण्याचे आदेश दिले असून, दोन्ही पक्षकारांसह दोघांचे वकील यांचे देखील कौतुक केले.

यातील वादी रेवा बेंडाळे यांची प्रकृती लक्षात घेता त्यांना न्यायालयात येणे शक्य नसल्याने न्यायाधीश श्री. यादव यांनी न्यायालय परिसरात असलेल्या रिक्षाजवळ जाऊन वादीची समक्ष भेट घेऊन संवाद साधला. या घटनेने उपस्थित भारावून गेले. कारण न्याय देण्यासाठी न्यायालय चालत बाहेर आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT