1) MLA Kishore Patil 2) Former MLA Dilip Wagh 3) Vaishali Suryavanshi 4) Amol Shinde esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabah Constituency : आखाडा लोकसभेचा, तालीम विधानसभेची! आजी- माजी अन्‌ भावी आमदार प्रचारात

सी. एन. चौधरी

Jalgaon Lok Sabah Constituency : जळगाव लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार दिवसागणिक शिगेला पोहोचत असून सर्व युक्त्या, क्लृप्त्या यांचा वापर प्रचारात केला जात आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आणि या भागातही त्याचे पडसाद जाणवले. ()

या निवडणुकीच्या निमित्ताने आजी- माजी व भावी आमदारही कामाला लागले आहेत. आखाडा लोकसभेचा असताना ही विधानसभेची रंगीत तालीम अथवा चाचपणी मानली जात आहे. पाचोरा - भडगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ, भाजपचे अमोल शिंदे हे २०१९ च्या निवडणुकीतील कट्टर विरोधक तसेच पुढे येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीतील कट्टर विरोधक महायुतीच्या प्रचारात एकत्रितपणे प्रचारार्थ फिरत आहेत.

हे तिघे जाहीर सभेप्रसंगी एकाच व्यासपीठावर, प्रचार फेरीत एकत्र वावरताना दिसत असले तरी एकमेकांशी बोलणे मात्र कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे संजय वाघ हे प्रचारात सक्रिय झाले आहेत. प्रचाराला दिवसागणिक गती मिळत आहे.

गेल्या वेळचे विरोधक आता फिरताय एकत्र

गेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ व अपक्ष परंतु भाजपचा छुपा पाठिंबा असलेले अमोल शिंदे हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. अमोल शिंदे यांनी त्यावेळी चांगलीच मुसंडी मारली परंतु किशोर पाटील यांना विजयश्री मिळाली व ते दुसऱ्यांदा आमदार बनले. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय बदल झाले. फोडाफोडीचे राजकारण झाले. ( latest political news )

अनेकांनी इकडून तिकडे उड्या मारल्या त्यामूळे आता एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या व भविष्यातही एकमेकांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी सज्ज असलेल्या या तिघांना एकत्रितपणे महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी फिरावे लागत आहे. श्रीमती वाघ विजयी झाल्या तर त्याचे श्रेय नेमके कोण घेणार, अथवा मतदार कोणाला देणार, हादेखील प्रश्न महत्त्वाचा आहे.

भाजप मदत करेल काय?

जाहीर सभांमधून आम्ही नेहमीच भाजपला मदत करत आलो. त्यामुळे भाजपाचा खासदार विजयी झाला. आताही आम्ही एक दिलाने भाजपासोबतच आहोत असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे उघडपणे बोलले जात आहे. परंतु भविष्यात भाजप शिवसेनेला अशा पद्धतीने मदत करेल काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कारण पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, भाजपचे अमोल शिंदे हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे ते आता एकत्र असून पुढे एकमेकांविरुद्ध कसा प्रचार करणार असा प्रश्न मतदारांमधून उपस्थित केला जात आहे.

वैशाली सूर्यवंशी प्रचारात

उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी या महाविकास आघाडीच्या प्रचारात गुंतल्या असून त्यांनीही या माध्यमातून विधानसभेची चाचपणी व तयारी सुरू केली असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे आखाडा लोकसभेचा असला तरी तालीम मात्र विधानसभेची सुरू असल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT