Code of Conduct esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Code of Conduct : धार्मिक झेंडे स्वेच्छेने काढू शकतात : खेडकर

Jalgaon Lok Sabha Code of Conduct : धार्मिक झेंडे काढणे नागरिकांना सक्तीचे नाही ते स्वेच्छेने काढू अथवा लावू शकतात अशी माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Code of Conduct : आचारसंहिता निमित्त राजकीय झेंडे ,पोस्टर अथवा बॅनर काढून घेतले जात आहेत. मात्र धार्मिक झेंडे काढणे नागरिकांना सक्तीचे नाही ते स्वेच्छेने काढू अथवा लावू शकतात अशी माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यानन्तर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी महसूल ,पंचायत समिती ,पोलीस प्रशासन , नगरपालिका सह सर्व विभागांची बैठक घेऊन आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. (Jalgaon Lok Sabha Code of Conduct Khedkar statement Religious flags can be removed voluntarily)

प्रत्येक विभागाचे कर्मचारी शहरात तथा ग्रामीण भागात फिरून सार्वजनिक ठिकाणी असलेले राजकीय पक्षांचे पोस्टर्स , झेंडे , बॅनर्स ,विकासकामांचे फलक काढून घेत आहेत. तसेच नागरिकांच्या घरावरील झेंडे , चिन्ह देखील काढण्याच्या सूचना देत आहेत. मात्र हे करत असताना पालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना रामाचा फोटो असलेले किंवा हिंदू धर्माचा भगवा झेंडा.

मुस्लिम धर्माचा हिरवा झेंडा देखील काढण्याच्या सूचना देत असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता. काहींनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेतली असता धार्मिक झेंडे काढण्याची सक्ती नाही असे खेडकर यांनी सांगितले. (latest marathi news)

दरम्यान राजकीय व्यक्तींनी लावलेले पथदिवे अथवा हायमॉस्ट लॅम्प वर त्यांच्या नावाचे फलक व राजकीय पक्षाचे चिन्ह असल्याने ते झाकण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. उंच शिड्या आणून खांबावर चढणे आणि त्याला कागद किंवा कापड चिकटवणे यासाठी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत.

आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , गटविकास अधिकारी सुशांत पाटील ,पोलिस निरीक्षक विकास देवरे , मुख्याधिकारी तुषार नेरकर व त्यांचे सहकारी डोळ्यात तेल घालून कानाकोपऱ्यात ,बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT