Amol Jawle esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : ‘मोदी टू बूथ’ अभियानाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचतोय! अमोल जावळे

Lok Sabha Constituency : लोकसभेची यंदाची सार्वत्रिक निवडणूक विकसित राष्ट्रनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभेची यंदाची सार्वत्रिक निवडणूक विकसित राष्ट्रनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या देशाला वैभवाकडे घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित रालोआ सरकार प्रयत्नशील आहे. दहा वर्षांत त्याचा प्रत्यय जनतेला आला असून, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे, त्यासाठी संघटना म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत, अशी भूमिका भाजपचे पूर्व भागातील जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी मांडली. लोकसभा निवडणुकीनिमित्त श्री. जावळे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी ‘सकाळ’शी विविध मुद्यांवर दिलखुलास बातचीत केली.( Amol Jawale statement of Teaching voters through Modi to Booth campaign )

संघटनात्मक तयारी

निवडणुकीनिमित्त पक्षाच्या संघटनात्मक तयारीबद्दल बोलताना श्री. जावळे म्हणाले, की पक्षाचा मूळ गाभाच संघटन आहे. आमची संघटनात्मक यंत्रणा केवळ निवडणुकीपुरती नसून ती कायमस्वरूपी सक्रिय असते. दोन महिन्यांपूर्वीच आमचे तालुका व गटनिहाय मेळावे झाले. आता मतदानाला अवघे १०-१२ दिवसच उरलेत.

त्यामुळे येणाऱ्या पाच-सहा दिवसांत पुन्हा बूथप्रमुख, त्यावरील सुपर वॉरियर व सुपर वॉरियर्सला मॉनिटर करणारे पदाधिकाऱ्यांच्या गटनिहाय बैठका घेऊन नियोजन करण्यात येईल. हक्काच्या मतदारांना मतदानासाठी केंद्रापर्यंत आणण्याबाबत आवश्‍यक त्या सूचना देण्यात येत आहेत.

कार्यकर्ते घरोघरी पोचतांय

रावेर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रचनेबाबत बोलताना श्री. जावळे म्हणाले, की मतदारसंघाचे क्षेत्र खूप मोठे आहे. चौदाशेहून अधिक गावांपर्यंत पोचणे उमेदवाराला अथवा पदाधिकारी म्हणून आम्हालाही शक्य नाही. त्यामुळे उमेदवार म्हणून रक्षाताई विविध गावपातळीपर्यंतचे नियोजन करून दौरा करतांय.

दुसरीकडे आम्ही पदाधिकारी, विविध आघाडी- मोर्चा व फ्रंटचे प्रमुख म्हणून वेगवेगळ्या गावांपर्यंत पोचून मोदी सरकारच्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर सादर करतोय. ‘मोदी टू बूथ’, असे अभियान असून, संपूर्ण मतदारसंघात ते प्रभावीपणे राबविले जातेय. (latest marathi news)

विकसित राष्ट्रनिर्मितीसाठी...

दहा वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या कामांचा थेट सामान्य मतदारांना कसा लाभ झाला, त्यांचे जीवमनमान कसे बदलले, याची माहिती आम्ही जनतेपुढे मांडतोय. गेल्या दहा वर्षांतील मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था अकरावरून पाचव्या क्रमांकावर आली. आता जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत भारताला आणायचे आहे, म्हणून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आहे.

बैठका, कॉर्नरसभा, मेळाव्यांवर भर

गेल्या काही दिवसांतील लग्न सोहळ्यांची धूम, त्यातही उन्हाचा कडाका वाढल्याने यंदा प्रचारादरम्यान अनेक अडचणी येत आहेत. भर उन्हाळ्यात मे महिन्यात मतदान असल्याने मतदानाच्या टक्केवारीबद्दलही चिंता आहे. त्यामुळे आम्ही विविध क्षेत्रातील लोकांच्या बैठका, कॉर्नर सभा, मेळाव्यांवर भर दिला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभांवरील खर्च जास्त असतो. त्याच्या नियोजनातही खूप वेळ जातो. त्यामुळे त्या काही प्रमाणात टाळून व्यक्तिगत छोटेखानी सभांकडे लक्ष दिले जात असल्याचे ते म्हणाले.

संविधान बदलाच्या अफवांना उत्तर

भाजप नेत्यांनी ‘चारसो पार’चा नारा दिला. मात्र, या माध्यमातून संविधान बदलाच्या अफवाविरोधी पक्षांकडून पसरविल्या जात आहेत, जनतेची दिशाभूल केली जातेय. पक्षाने त्यास जशास तसे उत्तर देण्याचे ठरविले आहे. ‘चारसो पार’चा नारा विजयाचा विश्‍वास व्यक्त करणारा आहे. त्याचा संविधान बदलाशी काहीही संबंध नाही.

संविधान कुणीही बदलू शकत नाही, बदलणार नाही, यावर आमचे नेते ठाम आहेत आणि हेच मुद्दे घेऊन आम्ही आमच्या अनुसूचित मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणार आहोत, अशी माहितीही श्री. जावळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT