Jalgaon Lok Sabha Constituency : रावेर लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या स्नूषा भाजप उमेदवार रक्षा खडसे दोन लाख ७१ हजार मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या असून, एकनाथ खडसे यांच्याविषयी सहानुभूती व रक्षा खडसे यांनी केलेल्या कामांवर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या स्नूषा रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत चर्चा होती. (Hat Trick of faith on Khadse in Raver Lok Sabha Constituency )
त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, रक्षा खडसे यांचा मतदारसंघात दांडगा संपर्क, तसेच त्यांनी केलेली कामे या बळावर पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. नंतर त्यांचे सासरे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सोडून त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे एकदम वातावरण बदलले. (latets political news)
एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने अन्याय केल्याची सहानुभूती त्यांच्या मागे होती. तसेच रक्षा खडसे यांनी भाजपची प्रामाणिकपणे केलेली साथ. यामुळे जनतेने त्यांना तिसऱ्यांदा संधी दिली. मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे श्रीराम पाटील उभे होते. त्यांना मराठा व मुस्लिम मते मिळून ते विजयी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सर्व समाज ‘खडसे’ यांच्या पाठीशी उभा राहिला असल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.