Lok Sabha Constituency esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : चुरशीच्या लढतीत रक्षा खडसेंना किंचित ‘ॲडव्हान्टेज’

Lok Sabha Constituency : एरवी मतदानाचा खूप वाढलेला टक्का प्रस्थापिताच्या अथवा सरकारच्या विरोधात मानला जातो.

- सचिन जोशी, जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : एरवी मतदानाचा खूप वाढलेला टक्का प्रस्थापिताच्या अथवा सरकारच्या विरोधात मानला जातो. सन २०१९च्या तुलनेत रावेर मतदारसंघात आता यंदाच्या निवडणुकीतील मतदानात अवघ्या एका टक्क्याची वाढ झालीय.. या निवडणुकीत हा एक टक्का थेट निकालावर परिणाम करणारा नसेल. मात्र, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जाती-पातीच्या राजकारणावर गेलेल्या या लढतीत जातीय व धार्मिक समीकरणांवर आधारित गणिते मांडली जात आहेत. (Raksha Khadse has slight advantage in tight fight )

त्यात किंचीत का होईना, ‘ॲडव्हान्टेज भाजप’ असे चित्र दिसतेय. रावेर मतदारसंघ गेल्या तीस वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यातही गेल्या दोन्ही २०१४ व २०१९मधील निवडणुकींचा विचार करता रक्षा खडसे या दोन्ही वेळेस तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्यात. भाजपने पुन्हा एकदा रक्षा खडसेंना उमेदवारी दिली.

तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंनी सुनेसाठी भाजपत येण्याचा निर्णय जाहीर करत रक्षा यांच्या पाठिमागे आपली ताकद उभी केली. जाहीर प्रचारात उतरले नसले तरी त्यांनी रक्षा खडसेंसाठी मतदारसंघात अनेक ठिकाणी जाऊन छोट्या बैठका घेत सासऱ्याच्या रुपातील पिता म्हणून जबाबदारी पार पाडली. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने उद्योजक श्रीराम पाटलांना उमेदवारी दिली.

मूळचे रावेरचे असलेले श्रीराम पाटील उद्योजक असल्याने त्यांचा या परिसरात चांगला संपर्क होता. शिवाय, जातीय समीकरणांमध्येही मराठा समाजाचे प्राबल्य असल्याने त्यांना हा दुहेरी लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणुकीसाठी अर्ज भरुन माघारीनंतर चित्र स्पष्ट झाल्यावर रक्षा खडसे व श्रीराम पाटील यांनी स्वत:ला यंत्रणेसह प्रचारात झोकून दिले. सुरवातीला रक्षा खडसेंच्या बाजूने झुकलेली ही लढत नंतरच्या टप्प्यात प्रचार जाती- पातीच्या राजकारणावर गेल्यामुळे चुरशीची बनली. (latest political news)

मतदानाच्या दिवशी रावेर परिसरात चांगला पाऊस झाला, त्यामुळे तापमानाचा पारा घसरुन मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी उत्साह दिसून आला. गेल्या वेळच्या निवडणुकीतील मतदानाप्रमाणे यंदाही चांगले मतदान झाले. २०१९ ला रावेर मतदारसंघात ६३.५७ टक्के मतदान झाले होते. त्यात काहीशी वाढ होऊन यंदा मतदानाचा आकडा ६४.२८ टक्क्यांपर्यंत गेला. मतदानाच्या टक्क्यात झालेली किंचित वाढ थेट निकालावर परिणाम करणारी ठरु शकत नाही.

मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक नवीन मुद्दे समोर आले आहेत. एकतर अंतिम टप्प्यात ही निवडणूक जाती- पातीवर गेली. श्रीराम पाटलांसाठी काही सामाजिक संघटना प्रत्यक्ष प्रचारात उतरल्या होत्या. पुरुषोत्तम खेडेकरही या मतदारसंघात काही दिवस ठाण मांडून होते. त्यामुळे मतदानोत्तर दावे- प्रतिदाव्यांमध्ये जातीय समीकरणांची गणिते मांडून विजयाचा दोन्ही पक्षांकडून दावा केला जातोय.

जर ठराविक समाजाची लोक एकवटून ‘आपल्या’ उमेदवारास पाठबळ देत असतील, तर प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मागेही अन्य लहान-मोठ्या समाजांचे बळ उभे राहते, असाही अनुभव आहे. त्यामुळे प्रत्यक्षात एका टक्क्याने वाढलेले मतदान, त्यातही पहिल्यांदाच मतदान करणारे तरुण व केंद्र सरकारच्या योजनांचा थेट लाभ घेणाऱ्या लाभार्थींची भावना लक्षात घेता हे घटक रक्षा खडसेंना किंचित ‘ॲडव्हान्टेज’ देणारे ठरतील, असे दिसतेय.

रावेरमधील मतदान

२०१९ : ६३.५७ टक्के

२०२४ : ६४.२७ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

महाराष्ट्र राज्य खुली बॅडमिंटन स्पर्धा: हर्षित माहीमकरला दुहेरी मुकुटाची संधी, १७ वर्षांखालील मुले व पुरुष विभागाच्या अंतिम फेरीत

राज्यात महायुती सत्तेवर येताच संरक्षणासाठी 'यूपी'चे सूत्र लागू होणार; कोल्हापुरात योगी आदित्यनाथ यांची घोषणा

Narendra Modi : नायजेरियाबरोबरील भागीदारी महत्त्वाची मोदींचे प्रतिपादन; तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

SCROLL FOR NEXT