Smita Wagh, Karan Pawar, Raksha Khadse, Shriram Patil esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : जिल्ह्यात भाजप गड राखणार की मविआची मुसंडी? रावेर, जळगावच्या निकालाची उत्सुकता

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भाजपचा गड म्हणून जळगाव जिल्ह्याचा उल्लेख होतो. त्यामुळे अनेक वर्षांपासूनची जळगाव जिल्ह्यातील दोन्ही रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा काबीज करुन भाजप गड राखणार की, यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी जिल्ह्यात मुसंडी मारणार याचा फैसला अवघ्या काही क्षणांवर आला आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)

लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी (ता.४) होत असून त्यातून रावेरला भाजप- महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे हॅट्‌ट्रिक करतात की नवखे श्रीराम पाटील विजयी ठरतात, याबद्दल उत्सुकता आहे. तर जळगाव मतदारसंघातही महायुतीच्या स्मिता वाघ व शिवसेना ‘उबाठा’चे करण पवार यांच्यातील चुरशीच्या लढतीमुळे या मतदारसंघाच्या निकालाकडेही लक्ष लागून आहे.

चौथ्या टप्प्यात झाले मतदान

लोकसभा निवडणुकीच्या गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या राष्ट्रीय उत्सवात जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यात, म्हणजेच १३ मे रोजी मतदान झाले होते. जळगाव मतदारसंघात ५८.३८ टक्के तर रावेर मतदारसंघात ६४.२८ टक्के मतदान झाले होते.

विधानसभा क्षेत्रांचा विचार करता जळगाव लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक ६२.६४ टक्के मतदान जळगाव ग्रामीण मतदारसंघात तर सर्वांत कमी ५३.५५ टक्के मतदान जळगाव शहर मतदारसंघात झाले. रावेर लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक ७०.८१ टक्के मतदान रावेर विधानसभा तर सर्वांत कमी ५७.३८ टक्के मतदान भुसावळ मतदारसंघात झाले होते. (latest marathi news)

निकालाची उत्सुकता

जळगाव मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ व शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार करण पवार यांच्यात लढत झाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्री. जाधवही रिंगणात आहेत. तर रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार तथा विद्यमान खासदार रक्षा खडसे व शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत झाली.

वंचितचे संजय ब्राह्मणे हे तिसरे उमेदवार मैदानात होते. दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपने मोदी सरकारची विविध क्षेत्रातील कामगिरी, योजना व विकास हे मुद्दे मांडले. तर विरोधी उमेदवारांच्या वतीने स्थानिक मुद्यांवर भर देण्यात आला. सुरवातीला भाजपसाठी दोन्ही ठिकाणची निवडणूक सोपी वाटत असताना प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ह्या लढती अत्यंत चुरशीच्या झाल्यात. त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कॅप्टन, तर 150 kmph वेगात बॉलिंग करणाऱ्या मयंक यादवलाही संधी

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार'' राज ठाकरेंनी मांडलं गणित

Solapur News: ''भीमा" करणार पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप, खासदार धनंजय महाडिक यांचे वक्तव्य

MMRDA कडून 'या' परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला मंजूरी, 8,498 कोटी रुपयांची तरतूद

IPL Retention: ५ खेळाडू कायम राखण्याची फ्रँचायझीला मोजावी लागेल भारी रक्कम; थेट पॉकेटमधून ७५ कोटी कापणार

SCROLL FOR NEXT