smita wagh and karan pawar  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : पालकमंत्र्यांनी समन्वयातून आखलेली रणनीती प्रभावी

Lok Sabha Constituency : जळगाव ग्रामीण मतदारसंघात स्मिता वाघ यांच्या विजयासाठी महायुतीच्या तिन्ही मंत्र्यांसह एकवटलेली प्रचार यंत्रणा प्रभावी ठरली.

मिलिंद वानखेडे

Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव ग्रामीण मतदारसंघात स्मिता वाघ यांच्या विजयासाठी महायुतीच्या तिन्ही मंत्र्यांसह एकवटलेली प्रचार यंत्रणा प्रभावी ठरली. पक्ष संघटन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी असलेला समन्वय, विकासकामे ही जमेची बाजू होती. पक्षाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्या परस्पर समन्वयातून आखलेल्या रणनीतीने ‘जळगाव ग्रामीण’मधून त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे ६३ हजारांचे मताधिक्य मिळाले. ( strategy planned by Guardian Minister through coordination is effective )

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ यांच्याविरोधात शिवसेना (उबाठा) पक्षाचे करण पवार यांच्यात सामना होता. माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या बंडामुळे येथे शिवसेना (उबाठा) पक्षाला बळ मिळाले. मात्र, स्मिता वाघ यांचे पारडे सुरवातीपासूनच जड मानले जात होते. हिंदुत्वाचा मुद्दा, मराठा आणि नॉन मराठा मुद्दा प्रभावी ठरणार, असे वाटत होते.

एका बाजूने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लोकांनी भाजपला मतदान केल्याचे बोलत जात होते, तर दुसरीकडे मुस्लिम मतदारांनी मशालीच्या बाजूने मतदान केल्याची चर्चा होती. मात्र, सर्व चर्चांना विराम देत भाजप महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना तरुण व जनतेत असलेला मोदी फॅक्टर आणि त्यांनी केलेली विकासकामे फायदेशीर ठरली.

असे मिळाले मताधिक्य

विशेष म्हणजे, स्मिता वाघ यांच्या विजयात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा असून, ‘होमग्राऊंड अमळनेर’नंतर जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना १ लाख २६ हजार ९९२ मते मिळाली, तर करण पवार यांच्या पारड्यात ६३ हजार ८५२ मते पडली. स्मिता वाघ यांना तब्बल ६३ हजार ८५२ इतके मताधिक्य मिळाले. जे सहा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. (latest marathi news)

पालकमंत्र्यांच्या सभा, बैठका

माजी खासदार उन्मेष पाटील यांनी उमेदवारी न मिळाल्याने पक्षातून बाहेर पडून शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. त्या ठिकाणी आपल्या मित्राला उमेदवारी देऊन भाजपला आव्हान दिले. त्यामुळे सुरवातीला भाजपसाठी सहज सोपी वाटणारी निवडणूक कठीण बनली.

वाघ आणि पवार यांच्यातील ‘फाईट कट टू कट’ होईल, असे वाटत असताना, दुसरीकडे ‘जळगाव ग्रामीण’मध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्मिता वाघ यांच्यासाठी जोर लावला. त्यांच्यासह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाळधी, धरणगावसह विविध ठिकाणी सभा, बैठका घेतल्या. त्याचा चांगला फायदा झाला.

हे मुद्दे ठरले प्रभावी

जळगाव ग्रामीण मतदारसंघात अर्थकारण शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे शेतीनिगडित प्रश्‍नाचा विचार निवडणुकीत प्रामुख्याने करण्यात आला. उद्योग व त्या आधारवर मिळणारा रोजगाराचा प्रश्‍न महत्त्वाचा ठरला. कापूस, केळी, सिंचनावर मंथन झाले, तर राममंदिर, काश्‍मीरातून हटविलेले ३७० कलम, देशाची सुरक्षा या मुद्यांवरही सभांमध्ये भर देण्यात आला.

प्रामुख्याने विकासाचा प्रश्‍न अग्रभागी असल्याचे दिसून आले. दुसरीकडे शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते गुलाबराव वाघ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, विस्कळित प्रचार यंत्रणा, समन्वयाचा अभाव, उशिरा जाहीर झालेली उमेदवारी यासह करण पवार प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोचू न शकल्याने महाविकास आघाडीला अपयश आले.

विधानसभा निहाय २०२४ ची परिस्थिती

स्मिता वाघ (भाजप) : १,२६,९९२

करण पवार (शिवसेना उबाठा): ६३,८५२

मताधिक्य : ६३,८५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT