Suresh Jain and Eknath Khadse esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : सुरेश जैन, एकनाथ खडसे यांची राजकीय निवडणुकीच्या मैदानातून ‘एक्झिट’

Lok Sabha Constituency : देशावर कोणाची सत्ता असावी, याचा निकाल देणारी २०२४ ची लोकसभा निवडणूक पार पडत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Constituency : देशावर कोणाची सत्ता असावी, याचा निकाल देणारी २०२४ ची लोकसभा निवडणूक पार पडत आहे. सर्वच दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रासाठी आठवणीत राहणारी ही निवडणूक आहे. जिल्ह्यातील असलेले; परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी आपल्या कार्याने छाप पाडली आहे, असे दोन दिग्गज नेते सुरेश जैन व एकनाथ खडसे निवडणुकीच्या मैदानातून बाहेर पडत आहेत. (Suresh Jain Eknath Khadse exit from political election field )

आपण यापुढे कोणत्याही निवडणुकीच्या मैदानात राहणार नसल्याचे दोघांनीही जाहीर केले आहे.
महाराष्ट्राच्याच नव्हे; तर देशाच्या राजकारणात जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या कार्याने वेगळे नाव निर्माण केले आहे. देशाच्या राष्ट्रपतिपदी प्रतिभाताई पाटील यांची निवड झाली, हा खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा गौरव आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचा विचार केल्यास जळगाव जिल्ह्यातील नेते सुरेश जैन व एकनाथ खडसे यांनी वेगळी छाप पाडली आहे.

विशेष म्हणजे हे दोन्ही नेते वेगवेगळ्या विचारांचे आहेत. परंतु त्यानी एकेकाळी राज्याच्या मंत्रिमंडळात एकत्र काम केले आहे. खडसे यांनी भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यात मजबूत बांधणी केली, त्या बळावर त्यांनी जिल्ह्यात दोन खासदार पक्षाला दिले आहेत. जिल्हा परिषद, पालिकेवरही पक्षाचे वर्चस्व निर्माण केले. एकेकाळी युतीच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात दहा आमदार होते.

राज्यात पक्षाला सत्तेत वाटा मिळवून देण्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदी असताना आक्रमकपणे विषय मांडून आपला आणि पक्षाचाही ठसा उमटविला होता. पक्षाची सत्ता आलेली असताना त्यांना राज्याचे मंत्रिपदही मिळाले आहे. त्या माध्यामातून त्यांनी राज्यात अनेक जनहिताचे निर्णय घेतले. पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांना पक्षातून बाहेर पडावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवून ते आमदार झाले. (latest political news)

त्यानंतर आता पुन्हा त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून, लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचारही केला. आता त्यांनी यापुढे कोणतीही राजकीय निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांचा हा राजकीय संन्यास मानता येणार नाही. परंतु निवडणुकीच्या लढाईत ते प्रत्यक्ष मैदानात उमेदवार म्हणून नसणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय पटलावर त्यांचा तो आक्रमकपणा असणार नाही.

सुरेश जैनही मैदानात नसणार

जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री सुरेश जैन यांनीसुद्धा राजकीय पटलावरून निवृत्ती स्वीकारली आहे. निवडणुका लढणार नसल्याचे त्यांनी अगोदरच जाहीर केले होते. आता तर त्यानी पक्षाच्या राजकीय सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर ते दिसणार नाहीत. सुरेश जैन यांनी राजकीय क्षेत्रात पर्दापण केल्यानंतर आपल्या आक्रमकपणामुळे एक वेगळा ठसा निर्माण केला होता.

जळगाव पालिकेवर त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली, त्यानंतर महापालिकेवरही त्यांनी आपचे वर्चस्व निर्माण केले होते. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतर्फे विधानसभेत जळगावचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. पक्षाचे उमेदवार असले तरी ‘सुरेशदादा’ या नावाचे वलयही महत्त्वाचे होते. त्यामुळे जनतेने त्यांना नऊवेळा निवडून दिले. जळगाव पालिका व महापालिकेच्या माध्यमातून विकासाची विविध कामे त्यांनी केली.

परंतु राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. त्या ठिकाणीही त्यानी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. जळगाव विकासाचे मॉडेल त्यांनी तयार केले होते. त्यामुळे एकेकाळी अनेक नगर परिषदेचे अध्यक्ष व अधिकारी जळगाव शहराची कामे पाहण्यासाठी येत होते. याच कामाच्या आधारावर त्यांचे राज्यातच नव्हे; तर राज्याबाहेर नाव झाले होते.
जळगाव म्हणजे ‘सुरेशदादा’ अशी ओळख झाली होती.

मात्र पुढे त्याच्या राजकीय जीवनात उतार आले. २०१४ पासून ते राजकारणात फारसे सक्रिय राहिले नाहीत. आता २०२४ मध्ये त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राजकीय क्षेत्रात न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सुरेश जैन यांचा तो राजकीय व्यासपीठावर भाषणाचा आक्रमकपणाही जनतेला दिसणार नाही.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीच्या मैदानात न उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीत निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागणारच आहे. मात्र जिल्ह्यातील दोन आक्रमक नेत्यांनी तसेच निवडणूक लढण्याच्या राजकीय मैदानातून ‘एक्झिट’ घेतली हे मात्र लक्षात राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT