Electoral officers and staff while casting vote of 85-year-olds for Lok Sabha esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेल्या 103 वर्षांच्या आजोबांनी केले मतदान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : शहर जिल्ह्यात आज वयोवृध्दांच्या घरी जाऊन मतदान करण्याच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभला. मतदानाचा आज दुसरा दिवस होता आज साधारण ७३१ वयोवृद्धांनी मतदान केले. त्यात, चाळीसगावला स्वातंत्र्यांचा सुर्य पाहिलेल्या १०३ वयाच्या आजोबांची मतदानाचा हक्क बजावला. आज शनिवारी (ता.४) सायंकाळपर्यंत ७३१ लोकांनी आज मतदानाचा हक्क बजावला. ( 103 year old grandfather casts his vote )

काल ५२ जणांनी हक्क बजावला होता. उर्वरित उपलब्ध लोकांसाठी उद्या मतदान होईल. अशी माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेनी दिली. आज जळगाव लोकसभा निवडणुकीचे सर्व सामान्य निरीक्षक राहुल गुप्ता यांनी जळगाव मधील होम सुविधा उपलब्ध असलेल्या पहिल्या ज्येष्ठांना प्रमाणपत्र दिले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही घरी जाऊन ज्येष्ठांच्या ' होम वोट सुविधेची पाहणी केली.

निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांनी ' होम वोटिंग सुविधा ' उपलब्ध करून दिली. चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे ( खुर्द ) या गावातील १०३ वर्षाच्या धोडगीर शंकर गोसावी यांच्या घरी जाऊन निवडणूक यंत्रणेनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार त्यांचा मतदानाचा हक्क मिळवून दिला.

धोडगीर शंकर गोसावी यांचा जन्म १९२१ चा असून त्यांनी स्वातंत्र्य भारताचा सूर्योदय पाहिला आहे. भारताच्या पहिल्या निवडणुकी पासूनचे ते साक्षीदार असल्यामुळे त्यांचा मतदार म्हणून मत करतानाचा फोटो स्वातंत्र्याचे मोल सांगून जातो. (latest marathi news)

अमळनेरला १३१ मतदान

लोकसभेसाठी ८५ वर्षावरील वृद्ध व दिव्यांगांनी आज शनिवारी (ता.४) १३१ जणांनी होम मतदान केले. २३ जणांचे मतदान बाकी राहिले आहे त्यांच्यासाठी पुन्हा ९ रोजी संधी देण्यात आली आहे. विधानसभा मतदार संघात लोकसभेसाठी दिव्यांग आणि ८५ वर्षे पेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांसाठी घरी जाऊन आज शनिवारी (ता.४) मतदान घेण्यात आले.

अमळनेर विधानसभा मतदार संघात २९ दिव्यांग , १३० वयस्कर असे एकूण १५९ मतदार होते. प्रत्येक मतदाराला बीएलओ मार्फत वेळ कळवण्यात आली होती. प्रत्येक मतदाराच्या घरी मतदान केंद्र तयार करण्यात आले. एकूण दहा पथके होती. प्रत्येक पथकात मतदान केंद्र अधिकारी ,निरीक्षक ,शिपाई ,कॅमेरामन असे सहा कर्मचारी होते.

उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा स्वतः एक पथकात मतदारांच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही मतदानाच्या वेळी भेट दिली. २३ मतदारांपैकी काही मतदार बाहेरगावी गेलेले होते. पाच जण मृत झाले आहेत.

आजचे मतदान

रावेर-१००, मुक्ताईनगर-१०६, भुसावळ-१०७, जळगाव शहर-१०७, जामनेर-८४, चाळीसगाव ७६, जळगाव (ग्रामीण)-१०८, एरंडोल - ११६ आणि चोपडा-४३ असे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT