Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) मतदान झाले. लोकशाही लोकोत्सवात प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न केले. मोठा गाजावाजाही केला. तरीही बहुतेक ठिकाणी मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचे दिसून आले. यात मजरे हिंगोणे (ता. चोपडा) सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह मतदार मतदान करण्याच्या अधिकारापासून वंचित राहिल्याची माहिती मिळाली. 105 people from Majre Hingona deprived of voting )
रावेर लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. यात मजरे हिंगोणे (ता. चोपडा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर बऱ्याच मतदारांची नावे मतदारयादीत मिळून न आल्याने नाराजी दिसून आली. काही मतदारांची नावे असूनही त्यांच्या नावापुढे ‘डिलेटेड’ असा शेरा असल्याने त्यांना मतदान करता आले नाही.
यात ३५ मतदार आहेत, तर ६५ ते ७० जणांची नावे यादीत नव्हती, अशी जवळपास एकूण १०० ते १०५ मतदारांना मतदान करता आले नाही. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत मतदारांनी केंद्राध्यक्षांसह तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली आहे. (latest marathi news)
गावाचा प्रथम नागरिकही मतदानापासून वंचित
या सर्व प्रकारात मजरे हिंगोणा येथील सरपंच कल्पना पाटील, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव पाटील, पोलिसपाटील पुष्पा कचरे, लालासिंग पाटील यांच्यासह ३५ जण मतदानापासून वंचित राहिले. यात दोष यंत्रणेचा आहे, की मतदारांचा आहे. मात्र, मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत अनेक वेळा गावातच रहिवासी असून, मतदान केले आहे. तरीही यादीत नाव कसे आले नाही? ऑनलाईन यंत्रणेत नाव आहे. मात्र, मतदारयादीत नाव नाही. यामुळे अशोक धनगर यांना मतदान करता आले नाही. यावर त्यांनी पहिल्यांदाच मतदानापासून वंचित राहिल्याची प्रतिक्रिया दिली.
''मी गावाची प्रथम नागरिक असूनही माझ्यासह इतर ३५ नागरिकांचे मतदारयादीतून नाव डिलीट कसे झाले, याची सखोल चौकशी करावी. आमचे कोणाचेही नाव दुबार नाही किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी नाही किंवा शासनाकडून आम्हाला तशी नोटीसही अद्यापपर्यंत मिळालेली नाही. तरी आमची नावे मतदारयादीतून डिलीट होणे व इतर लोकांची नावे यादीत न येणे, हा निव्वळ शासनाच्या यंत्रणेचा भोंगळ कारभार आहे. संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही होऊन आम्हास न्याय मिळावा.''-कल्पना पाटील, सरपंच, मजरे हिंगोणे (ता. चोपडा)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.