Election  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election 2024: प्रचार तोफा थंडवल्या, आता प्रतिक्षा मतदानाची! शेवटच्या दिवशी उमेदवारांचा रॅलीवर अधिक भर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार शनिवारी (ता. ११) थंडावला. उमेदवारांनी रॅली काढण्यावरच अधिक भर दिला. आता सोमवारी (ता. १३) होणाऱ्या मतदानाची प्रतिक्षा आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण चौदा उमेदवार रिंगणात आहेत. यात खरी चुरस भारतीय जनता पक्ष व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार स्मिता वाघ विरुद्ध शिवसेना उबाठा व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्यात आहे. (Jalgaon Lok Sabha Election 2024 Campaign stop now news)

दोन्ही उमेदवारांना मतदारसंघात फिरून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला होता. स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा झाल्या, तर महाविकास आघाडीचे करण पवार यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या सभा झाल्या.

रावेर मतदारसंघात खरी लढत भाजप व मित्र पक्ष महायुतीच्या उमेदवार खासदर रक्षा खडसे विरुद्ध़ राष्ट्रावादी कॉंग्रेस (शरद पवार) व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात आहे. दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन नागरिकांच्या भेटी घेत प्रचार केला. (latest marathi news)

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभा घेण्यात आल्या, तर श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते शरद पवार यांची सभा घेण्यात आली.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी रॅली काढण्यावर अधिक भर दिला. भाजपतर्फे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शहरात रॅली काढण्यात आली, तर शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. आता प्रचाराची सांगता झाली असून, सोमवारी (ता. १३) होणाऱ्या मतदानाकडे उमेदवारांचे लक्ष असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT