Lok Sabha Election esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election 2024 : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! जळगाव, रावेरसाठी सोमवारी मतदान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या प्रचारामुळे निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या जाहीर प्रचाराची सांगता शनिवारी (ता. ११) सायंकाळी सहाला होणार आहे. शनिवारी सायंकाळी सहानंतर आता कोणाही उमेदवाराला जाहीररित्या प्रचार करता येणार नाही. (Jalgaon Lok Sabha Election 2024 Campaign will stop today)

जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर मतदारासंघातील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या लढतीत जाहीर प्रचाराने जोरदार रंगत आणली. जळगाव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या माजी आमदार स्मिता वाघ विरुद्ध महाविकास आघाडीचे करण पाटील-पवार, तर रावेर मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्यात लढत होत आहे. रावेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय ब्रह्मणे यांनी महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढविली आहे. जळगाव आणि रावेर मतदार संघासाठी येत्या सोमवारी (ता. १३) मतदान होणार आहे.

सभांनी राजकीय वातावरण तापले

लोकसभा निवडणुकीनिमित्त जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचार सभा झाल्या. या प्रचार सभांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली.

यंत्रणा सज्ज

जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रांची निर्मिती झाली असून, तेथे वीज, पाणी, पंखे यांची व्यवस्था करण्यात येत आहे. सोबतच आरोग्य मदत केंद्र, पाळणा घराची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ३८ लाख १५ हजार ७९६ मतदार आहेत. (Jalgaon Political News)

मतदारसंघनिहाय मतदार असे

जळगाव लोकसभा मतदारसंघ

*पुरुष मतदार : १० लाख ३७ हजार ३५०

*महिला मतदार : ९ लाख ५६ हजार ६११

*किन्नर मतदार : ८५

*एकूण मतदार : १९ लाख ९४ हजार ४६

रावेर लोकसभा मतदारसंघ

*पुरुष मतदार : ९ लाख ४१ हजार ७३२

*महिला मतदार : ८ लाख ७९ हजार ९६४

*किन्नर मतदार : ५४

*एकूण मतदार : १८ लाख २१ हजार ७५०

----------

*एकूण मतदार केंद्रे : ३ हजार ८८६

*वेब कास्टिंग होणारे केंद्रे : २ हजार २८८

*कर्मचारी नियुक्ती : २० हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT