Smita Wagh, Karan Pawar esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Result : पालकमंत्र्यांची रणनीती, भाजपची बूथ योजना अन राष्ट्रवादीची साथ यातूनच स्मिता वाघांना लीड!

Lok Sabha Election 2024 Result : जळगाव ग्रामीण मतदारसंघात ६३ हजार १४० मतांचे मताधिक्य स्मिता वाघ यांना मिळाले.

डी. एस. पाटील

धरणगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात जळगाव ग्रामीणमध्ये खासदार स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन नंबरचे लीड जळगाव ग्रामीणमध्ये मिळाला. त्यामुळे भाजपसह पालकमंत्र्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे यांची एक पोटनिवडणूक सोडली, तर या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. भाजपसह संघाची रणनीती व पालकमंत्र्यांचे वर्चस्व यातूनच हे मताधिक्य वाढल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचीही मदत झाली. त्यामुळे सुरुवातीला अवघड वाटणारी निवडणूक नंतर सोपी झाली. (Jalgaon Lok Sabha election 2024 Result Smita Wagh to victory)

जळगाव ग्रामीण मतदारसंघात ६३ हजार १४० मतांचे मताधिक्य स्मिता वाघ यांना मिळाले. अमळनेर विधानसभा मतदारसंघानंतर दुसऱ्या क्रमांकाचा लीड जळगाव ग्रामीणने दिला. विरोधी उमेदवार करण पवार यांचा जळगाव ग्रामीणशी फारसा नसलेला संबंध, भाजपमधून अचानक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करून केलेली उमेदवारी भाजप नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना आवडली नव्हती.

याशिवाय माजी खासदार उन्मेश पाटील यांनीही आपले तिकीट कापल्याने शिवसेनेत (ठाकरे) केलेला प्रवेश या मतदारसंघात फारसा प्रभावी ठरला नाही. जळगाव ग्रामीणध्ये धरणगाव शहर सुरुवातीपासून संघाचे व भाजपचा प्रभाव असलेले शहर. सोबत पालकमंत्र्यांची साथमुळे जळगाव ग्रामीणमध्ये लीड निश्चित होता.

धरणगाव तालुक्यात भाजपचे सुभाष पाटील, पी. सी. पाटील, डी. जी. पाटील, संजय महाजन, दिलीप महाजन, रायपुरकर, चंदन पाटील, शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शहराध्यक्ष विलास महाजन, पप्पू भावे, विजय महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, रमेश पाटील, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन सर्वाधिक लीड देण्यासाठी प्रयत्न केले.

दुसरीकडे शिवसेनेचे (ठाकरे गट) सहसंपर्कप्रमुख गुलाब वाघ, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, गुलाबराव देवकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. व्ही. डी. पाटील, अनंत परिहर आदींनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, त्यांची झुंज ही एकाकी ठरली.

स्थानिक महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या नियोजनबद्ध प्रचारामुळे स्मिता वाघ यांना मताधिक्य मिळाले. या यशात पालकमंत्री पाटील, भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) यांचे योगदान आहे. २०१४ व २०१९ची जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणुकीची आकडेवारी पाहता भाजप उमेदवाराला प्रत्यक्ष मिळालेल्या मतांपेक्षा जास्तीचा लीड या मतदारसंघात मिळाला. (latest marathi news)

जळगाव ग्रामीण ( लोकसभा २०२४)

स्मिता वाघ.. १२६९९२

करण पवार..६३८५२

मताधिक्य.....६३१४०

@ जळगाव ग्रामीण २०१४ विधानसभा निवडणूक

गुलाबराव देवकर.राष्ट्रवादी..५२६५३

पी सी पाटील भाजपा.......४४०११

गुलाबराव पाटील सेना...८४०२० विजयी

मताधिक्य...३१३६७

@ जळगाव ग्रामीण २०१९ विधानसभा निवडणूक

गुलाबराव पाटील सेना...१०५३५० विजयी

चंद्रशेखर अत्तरदे अपक्ष ...५९००७

सौ पुष्पाताई महाजन राष्ट्रवादी...१७८६९

मताधिक्य............४६३४३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT