Jalgaon News : लोकसभा निवडणुकीत होम वोटिंगसाठी अर्ज केला होता. अशांसाठी शुक्रवार (ता. ३)पासून होम वोटिंग प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी ५२ जणांनी होम वोटिंगचा लाभ घेतला. पहिले मतदान रावेर लोकसभा मतदारसंघात सावदा (ता. रावेर) येथील सुशीला राणे यांनी सकाळी १० वाजून ३६ मिनिटाला केले. (52 people vote on first day through home voting)
दिव्यांग मतदार रूपाली कोलते (रा. सालबर्डी, मुक्ताईनगर) यांनी ११ वाजून ५ मिनिटाला केले. एकूण ५५ मतदारांनी मतदान करणे अपेक्षित होते. मात्र, ५२ ज्येष्ठ मतदारांनी मतदान केले, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, सीईओ अंकीत या वेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात आजपासून ‘होम वोटिंग’
जिल्ह्यात शनिवारी (ता. ४) व रविवारी (ता. ५) होम वोटिंग मोहीम सुरू होत असून, एकूण एक हजार ५२५ जणांनी होम वोटिंगसाठी (८५ वर्षांवरील) अर्ज केले आहेत. त्यासाठी ११९ पथकांची नेमणूक केली आहे. ते संबंधित नागरिकांच्या घरी जाऊन बॅलेट पेपरवर मतदान करून घेतील.
मतदारांचा चहा, पाणी घेऊ नका
मतदारांच्या घरी चहा, पाणी, नाश्ता घेऊ नका. मतदारांना मतदान प्रक्रियेची सूचना द्या. मात्र, त्यांना कोणाला मतदान करा, असे सांगू नका. मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करा. मात्र, कोणाला मतदान करताहेत याचे चित्रीकरण करू नका. मतदारांच्या घरी गर्दी होणार नाही. पक्षाचे पदाधिकारी मतदानावेळी नसतील, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या आहेत.
तडीपार मतदानासाठी अर्ज करू शकतात
तडीपार व कैदेत असलेले गुन्हेगारांनी पोलिसांकडे मतदान करण्याबाबत अर्ज केला, तर ते मतदान करू शकतात. (latest marathi news)
२,२८८ केंद्रावर वेबकास्टिंग
जिल्ह्यात ३,८८६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी २,२८८ मतदान केंद्रावर वेबकस्टिंग होणार आहे. २०४ मायक्रो ऑब्जर्वरची नियुक्ती केली आहे. मतदानावेळी लक्ष ठेवून रिपोर्टिंग करतील.
गरोदर माता, बालकांसाठी सोय
मतदान केंद्रावर गरोदरमाता, रक्तदाब, मधुमेह असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी आरोग्य कक्षाची प्रत्येक मतदान केंद्रावर निर्मिती केली आहे. बालकांची काळजी घेण्यासाठी अंगणवाडीसेविकांची नियुक्ती असून, पाळणा घरही आहे. जिल्ह्यात ५४ हजार गरोदरमाता आहेत.
त्यांना सकाळी लवकर मतदान करण्याच्या सूचना घरोघरी जाऊन अंगणवाडीसेविकांनी दिल्या आहेत. मतदान केंद्रावर मतदाराला आरोग्यासंबंधी काही प्रश्न असेल, तर त्यांना आरेाग्य कक्षात तपासून लागलीच उपचार केले जातील. सर्व प्रकारची औषधी त्याठिकाणी असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.