Jalgaon Lok Sabha Election : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) मतदान झाले. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण ५८.४७ टक्के, तर रावेर लोकसभा मतदारसंघात ६४.२८ टक्के मतदान झाले आहे. सोमवारी सकाळी सातपासून मतदान प्रक्रियेला दोन्ही मतदारसंघांत सुरवात झाली. ( 58 percent for Jalgaon and 64 percent for Raver )
सायंकाळी सहापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. सकाळी ऊन होण्यापूर्वीच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या अल्पबचत भवनात मतदान केंद्रांवरील हालचाल टिपण्यासाठी वेबकास्टिंग कक्ष स्थापन करण्यात आला होता. स्वतः जिल्हाधिकारी दिवसभर त्यावर लक्ष ठेऊन होते. त्यामुळे मतदान शांततेत पार पडले.
सकाळी ११ ते दुपारी एकदरम्यान सर्वाधिक मतदान. जिल्ह्यात सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत सर्वाधिक मतदान झाले. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळी गर्दी झाल्याचे दिसून आले. दुपारी उन्हाची वेळ झाल्यानंतर मात्र गर्दी ओसरली. (latest marathi news)
मतदानाची टक्केवारी
जळगाव लोकसभा मतदारसंघात ६ लाख २८ हजार १२३ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर ५ लाख ३७ हजार ८२७ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. १८ तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजाविला. एकूण ६०.५५ टक्के पुरुष, ५६.२२ टक्के महिला व २१.१८ टक्के तृतीयपंथीय मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, असे एकूण ५८.४७ टक्के मतदान झाले.
रावेर लोकसभा मतदारसंघात ६ लाख २१ हजार ९८३ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर ५ लाख ४८ हजार ९५० महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला, तर ११ तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजाविला. एकूण ६६.०५ टक्के पुरुष, ६२.३८ टक्के महिला व २०.३७ टक्के तृतीयपंथीय मतदारांनी हक्क बजावला, असे एकूण ६४.२८ टक्के मतदान झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.