A. T Patil esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : मोदीच्या सभेनंतर भाजप उमेदवार हर्षोल्हासात नाचले; जळगाव लोकसभा मतदार संघ

Lok Sabha Election : सन २०१४ ची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी खऱ्या अर्थाने आव्हानात्मक होती.

कैलास शिंदे, जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : सन २०१४ ची लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी खऱ्या अर्थाने आव्हानात्मक होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रथमच निवडणूक लढविली जात होती. भाजपतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा ए. टी.पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून डॉ.सतीश पाटील यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. (Jalgaon Lok Sabha Election After Modi rally BJP candidates can celebrate marathi news)

त्यावेळी काही अंशी डॉ. पाटील यांचे पारडे जड होते, आणि भाजपचे ए .टी. पाटील यांच्या विजयाची शंका उत्पन्न केली जात होती. मात्र, जळगाव येथे नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी सभेतील प्रचंड गर्दी पाहून सभेनंतर उमेदवार ए. टी.पाटील अक्षरश: नाचले होते. कारण हीच सभा त्यांच्या विजयाचा ‘टर्निग पॉइंट’ ठरली. जळगाव लोकसभा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला आहे.

मतदार पुनर्रचनेनंतरही या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार निवडून आले आहेत. सन २००८ मध्ये भाजपने प्रथमच ए. टी. पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी विजय मिळवित जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे कायम राखली होती. पक्षाने सन २०१४ मध्ये पुन्हा ए. टी.पाटील यांना उमेदवारी दिली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप निवडणुका लढविणार होता. त्यामुळे पक्षात एक जोश होताच.

दोन्ही उमेदवार पारोळ्याचे

विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीने पारोळा येथील तत्कालीन आमदार डॉ.सतीश पाटील यांना उमेदवारी दिली होती. डॉ.पाटील हे आक्रमक होते, त्यावेळी महाविकास आघाडीही जोरात होती. डॉ. पाटील हे लोकसभेचे प्रथमच उमेदवार होते. विशेष म्हणजे डॉ.पाटील हेही पारोळ्याचे तर ए. टी.पाटील हे सुध्दा पारोळा येथील रहिवाशी होते. दोन पारोळेकरांमधील लढत हा चर्चेचा विषय झाला होता.  (latest marathi news)

आमदारकी विरुद्ध खासदारकी

ए. टी. पाटील हे विद्यमान खासदार व दुसऱ्यांदा उमेदवार असल्याने त्यांच्या पाच वर्षांचा कामाचा लेखोजोखा ते मांडत होते. परंतु दुसरीकडे डॉ. सतीश पाटील हे प्रथमच लोकसभेचे उमेदवार होते. तसेच आपल्या पारोळा मतदारसंघात केलेल्या आमदारकीची साक्ष ते देत होते. त्यामुळे दोन्ही उमेदवारात काट्याची लढत असल्याचे चित्र दिसत होते.

एक वेळ अशी आली की, आघाडीचे उमेदवार डॉ.सतीश पाटील यांचे पारडे जड असल्याचे दिसू लागले होते. त्यामुळे आता डॉ.पाटील यांना एखाद्या मोठ्या काहीतरी चमत्काराची अपेक्षा होती. त्याचवेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व पक्षाचे स्टार कॅम्पेनर असलेले नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा जळगाव येथे घेण्याचे निश्‍चित झाले.

जळगाव- रावेरसाठी ‘कॉमन’ दूरदर्शन टॉवरजवळचे मैदान

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने मोदी यांची सभा कोठे घ्यावी याबाबत पक्षातर्फे ठिकाणाचा शोध सुरू करण्यात आला. त्यावेळी रावेर लोकसभा मतदार संघात प्रथमच रक्षा खडसे या निवडणूक लढवित होत्या. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना सभेचा फायदा व्हावा यासाठी दोन्ही मतदार संघाच्या सरहद्दीवर म्हणजे जळगाव येथे नशिराबाद रस्त्यावर दूरदर्शन टॉवर नजिक असलेल्या मोकळ्या मैदानावर ही सभा घेण्याचे निश्‍चित झाले.

२० एप्रिल २०१४ ला दुपारी तीन वाजता ही सभा घेण्यात आली. या मैदानावर प्रचंड जनसागर उसळला होता. नरेंद्र मोदी यांनीही आपल्या धारदार वक्तव्याने या सभेत जळगाव जिल्हावासियांची मने जिंकून घेतली होती. सभेच्या गर्दीचाही विक्रमच झाल्याचे दिसून आले. सभा अत्यंत चांगल्या पध्दतीने पडली.

अन्‌ लाखांचे मताधिक्य

सभेसाठी झालेली प्रचंड गर्दी तसेच जनतेचा उत्साह पाहून जळगाव जिल्ह्यात भाजपच्या दोन्ही जागा येणार याचा विश्‍वास भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांत दिसून आला. मोदींची सभा पार पडल्यानंतर जनतेच्या अभूर्तपूर्व प्रतिसादामुळे आपला विजय निश्‍चित असल्याचे भाजप उमेदवार ए.टी.पाटील यांना वाटले. त्यावेळी हर्षोल्हासात ते कार्यकर्त्यांसोबत नाचले. त्यानंतर मतदान होऊन निकाल जाहीर झाले.

त्यावेळी ए.टी.पाटील यांना तब्बल ६ लाख ४७ हजार ७७३ मते मिळाली तर आघाडीचे डॉ.सतीश पाटील यांना २ लाख ६४ हजार २४८ मते मिळाली. ३ लाख ८३ हजार ५२५ विक्रमी मताधिक्य घेवून ए.टी.पाटील जळगाव लोकसभेतून दुसऱ्यांदा खासदार झाले. त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांची जळगाव येथे झालेली ती सभा खऱ्या अर्थाने ‘टर्निंग पॉंईट’ ठरल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT