Lok Sabha Election 2024 esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : सोशल मीडियाच्या युगातही उमेदवारांचा ‘डोअर टू डोअर’ प्रचारावरच विश्‍वास

Lok Sabha Election : कोरोना’नंतर होणारी ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. कोरोना काळात सोशल मीडिया अधिक सक्रिय झाला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : ‘कोरोना’नंतर होणारी ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. कोरोना काळात सोशल मीडिया अधिक सक्रिय झाला. आता त्यामुळे प्रमाण अधिकच वाढले आहे. आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज संपर्क होत आहे. असे असले तरी सत्ताधारी व विरोधी पक्षाचे उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. शहरीच नव्हे, अगदी ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा उमेदवाराचा प्रयत्न दिसून येत आहे. (candidates still believe in door to door campaigning)

उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे उमेदवारांना उन्हाच्या झळा सहन करीत प्रचार करावा लागत आहे. आज सोशल मीडियाचे युग असले, तरी उमेदवार आजही पारंपरिक पद्धतीनेही प्रचार करीत आहेत. एकाच मार्गावरील गावे घेऊन त्या ठिकाणी प्रचार करण्यावर उमेदवारांचा अधिक भर दिसत आहे.

दुपारी उन अधिक असल्याने उमेदवार सकाळी सातपासूनच प्रचारास सुरवात करीत आहेत. दुपारी बारापर्यंत त्या-त्या गावात, तसेच शहरातील त्या-त्या भागात प्रचार दौरा केला जातो. दुपारी बारा ते चारपर्यंत विश्रांती घेतली जाते आणि चारनंतर साधारणत: सायंकाळी सातपर्यंत भेटीगाठी घेतल्या जात आहेत. (latest marathi news )

त्या-त्या भागातील पक्षाचे प्रतिष्ठित नागरिक, काही भागातील माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि ढोलताशांच्या गजरात प्रचार दौरे होत आहेत. उमेदवारापासून सोबतच्या नेत्यांच्या, तसेच कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाच्या चिन्हाचा पट्टा असतोच. जुन्याच पद्धतीप्रमाणे कार्यकर्ते पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाच्या तसेच आगे बढोच्या घोषणा देत आहेत.

सोशल मीडियावरून बातम्या व्हायल

वृत्तपत्रात आलेल्या बातम्या, तसेच पोर्टलवरील बातम्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येत आहे. पक्षाच्या सोशल मीडिया विभागातून त्या बातम्या व्हॅट्‌सअप, इन्स्टाग्राम, फेसबुकवर टाकल्या जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर बातम्यांच्या माध्यमातून जोरदार युद्ध सत्ताधारी व विरोधी पक्षातर्फे सुरू आहे.

कॉर्नर सभांतून प्रचार

उमेदवारांकडून गाठीभेटी सुरू आहेत. शिवाय जुन्याच प्रचार पद्धतीप्रमाणे शहर व ग्रामीण भागात कॉर्नर सभाही घेण्यात येत आहेत. रात्री आठनंतर कॉर्नर सभा होत आहेत. यात पक्षाचे स्थानिक नेतेे आपआपल्या उमेदवाराबाबत भूमिका जनतेला पटवून देत आहेत. त्यामुळे देशातील सर्वांत मोठ्या लोकशाही उत्सवाची वातावरणनिर्मिती होत असून, आता जनतेतही कोणाला मतदान करायचे, याची चर्चा होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT