BJP  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : भाजप उमेदवार प्रचाराला, महायुतीचे समन्वयक कुठे?

Jalgaon Lok Sabha Election : भाजपचे जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले. महायुतीचे उमेदवार म्हणून ते प्रचारालाही लागले.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भाजपचे जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले. महायुतीचे उमेदवार म्हणून ते प्रचारालाही लागले. मात्र, दोन आठवडे होऊन गेल्यानंतरही महायुतीतील तीनही पक्षांचे समन्वयक अद्याप कामाला लागल्याचे दिसत नाही. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील. (Jalgaon Lok Sabha Election 2024)

पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप घेत असलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर गिरीश महाजनांनी त्यासाठी महायुतीत समन्वयक नियुक्त करुन त्यांच्या माध्यमातून काम करण्यासंबंधी सूचना केल्या होत्या, तसे ठरलेही होते. मात्र अद्यापही हे समन्वयक पुढे आल्याचे दिसत नाही.

भाजपने दोन आठवड्यांपूर्वीच रावेर मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे व जळगावातून माजी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी घोषित केली. अपेक्षेप्रमाणे दोन्ही मतदारसंघांत भाजपमधूनच या उमेदवारींना विरोध झाला. जळगाव शहरात ब्राह्मण सभेत जिल्हा बैठक घेत पक्षाने नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

तिकीट कापलेले खासदार उन्मेश पाटील या बैठकीपासून दूर राहिले. सध्याची त्यांची भूमिका त्या बैठकीपासूनच नव्हे; तर पक्षापासूनही त्यांना खूप दूर घेऊन गेली आहे. अर्थात, हे झाले भाजपमधील अंतर्गत वादंग. महायुतीतील भाजपच्या मित्रपक्षांचीही या दोन्ही उमेदवारांच्या नावांवर नाराजी आहे. (Jalgaon Political News)

आणि ही स्थिती भविष्यात उद्‌भवणार याची कल्पना असल्याने दोन महिन्यांपूर्वी महायुतीचा समन्वय मेळावा होऊन त्यात विधानसभा क्षेत्रनिहाय समन्वयक नियुक्त करण्याचे ठरले होते. असे प्रत्येक ठिकाणी समन्वयक तर नियुक्त झाल्याचे दिसत नाही.

पण, ज्यांच्यावर जिल्ह्याची महायुतीच्या समन्वयाची हमी होती त्या चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनीही अद्याप समन्वयासाठीचे ‘पत्ते’ खुले केलेले नाहीत. त्यामुळे भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटाच्या नेते, पदाधिकाऱ्यांकडून त्या- त्या मतदारसंघात कुरबुरी आणि उमेदवारांच्या विरोधातील वक्तव्ये सुरुच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT