एरंडोल : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील, शहराध्यक्ष बबलू चौधरी यांच्यासह सुमारे ५०० पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्याने मतदारसंघात राजकीय भूकंप झाला आहे. (Jalgaon Lok Sabha Election Former taluk president of NCP Prof Manoj Patil joins shiv sena Shinde group)
आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी प्रा. पाटील व त्यांच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधून विधानसभा मतदारसंघावरील पकड मजबूत केली आहे. प्रा. पाटील यांच्या शिंदे गटातील प्रवेशासाठी सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांची महत्त्वाची भूमिका आहे.
प्रा. मनोज पाटील यांनी ३० वर्षांपूर्वी शिवसेनेपासूनच राजकीय जीवनाची सुरवात केली होती. शिवसेनेनंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपचे शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष या पदांवर त्यांनी काम केले आहे. शहरासह ग्रामीण भागातील युवकांचे त्यांनी मजबूत संघटन केले असून.
विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहत आला आहे. प्रा. पाटील सुमारे तीन ते चार वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून अलिप्त राहत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर ते कोणत्या गटात जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रा. पाटील व त्यांचे समर्थक भाजपत प्रवेश करतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. (Latest Marathi News)
शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी भाजपच्या मोठ्या नेत्याशी चर्चा करून निर्णय घेतला असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रा. पाटील यांची होणारी घुसमट लक्षात घेऊन आमदार चिमणराव पाटील आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्याशी संपर्क ठेवत पक्षात प्रवेश करून घेतला.
शिंदे गटात प्रवेश करताना प्रा. पाटील यांनी युवक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना त्यांच्या कार्याचे कौतुक केले. प्रा. पाटील यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला फायदा होण्यास मदत होईल.
पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यावर प्रा. पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ नगरसेवकांनी भाजपचे नगराध्यक्ष रमेश परदेशी यांना पाच वर्षे पालिकेत सहकार्य केले होते. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषत: पालिका निवडणुकीचे नियोजन प्रा. पाटील यांनी यापूर्वीच केले असून.
त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आमदार पाटील यांची ताकद त्यांना मिळणार आहे. शहरात आमदार पाटील यांच्यासह शिंदे गटाला युवकांचे संघटन व पाठबळ असलेल्या प्रा. पाटील यांच्यासारख्या युवा कार्यकर्त्याच्या प्रवेशामुळे मोठे बळ मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.