EVM esakal
जळगाव

Jalgaon Election: एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची निवडणूक! २५ जुलैपासून EVMची तपासणी होणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Election : आगामी निवडणुकांसाठी १ जुलैला अंतिम झालेली मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे. निवडणूक आयोगाने जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना पाठविलेल्या अधिसूचनेत ते नमूद केले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिटचे स्कॅनिंग व नोंदणी पूर्ण झाली आहे.

आता २५ जुलैपासून प्रथमस्तरीय तपासणी सुरू होणार आहे. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावले जाणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली. (Jalgaon Lok Sabha election in April May Inspection of EVMs will be held from July 25)

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाच हजार १६० ईव्हीएम मशिन आले आहेत. तीन हजार मशिन जादा जिल्ह्यात दिल्या आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांना अशाच पद्धतीने मशिन पुरविल्या आहेत. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रित होतील की काय, अशी चर्चा आहे.

मतदारसंख्या वाढल्याने काही ठिकाणी मतदान केंद्र वाढतील. एकूण तीन हजारांवर मतदान केंद्रे, इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट व कंट्रोल युनिटचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. आता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २५ जुलैपासून सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी होणार आहे.

त्यानंतर त्या सर्व मशिन स्टोअर रूममध्ये सीलबंद ठेवल्या जातील. निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर पुन्हा त्या यंत्रांची अंतिम तपासणी होईल.

दिवाळीत पालिका, झेडपी एकत्रित

मार्च २०२२ पासून प्रशासक असलेल्या सर्व महापालिका, जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका पावसाळा संपताच म्हणजेच सप्टेंबर व ऑक्टोबर २०२३ मध्ये एकत्रित होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एप्रिल २०२४ मध्ये लोकसभा, तर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी निवडणूक घेणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीत होण्याची शक्यता आहे.

त्यातून मतदारांचा कल सर्वच राजकीय पक्षांना समजणार आहे. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याचा निर्णय होऊ शकतो.

पक्ष फुटल्याने अनेकांची गोची

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षासोबत आता तीन पक्ष असल्याने अनेक मतदारसंघात उमेदवारांची गोची होणार आहे.

त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, असे इच्छुक ऐन निवडणुकीत विरोधी पक्षात जाऊ शकतात. पक्षातील काही जण भाजपमध्ये गेल्याने पक्षात राहिलेल्यांना आता आपल्याला संधी मिळेल, अशी आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT