Sonusingh Dhansing Patil, Vijay Naval Patil, MK Anna Patil esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election 2024 : पश्चिम भाग लाल दिव्यापासून वंचितच

Jalgaon Lok Sabha Election : देशातील राजकीय वाऱ्याच्या दिशेला जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी साथ दिली आहे.

कैलास शिंदे, जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : देशातील राजकीय वाऱ्याच्या दिशेला जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील मतदारांनी साथ दिली आहे. स्वातंत्र्यानंतर देशात कॉंग्रेसची लाट असतांना बैलजोडी आणि गायवासरूच्या चिन्हावर भरभरून मतदान केले, आणीबाणीनंतर सन १९७८ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षालाही प्रचंड प्रतिसाद दिला. तर पुन्हा इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील पंजा चिन्हाला मोठा विजय दिला. (Jalgaon Lok Sabha election 2024)

सन १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप- सेना युतीला साथ देत दोन्ही उमेदवार विजयी केले. मात्र या तिन्ही राजवटीच्या काळात जळगाव पूर्व भागाला केंद्रांतील सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले परंतु पश्‍चिम भाग आजपर्यंत मंत्रीपदापासून दूरच राहिला आहे. राजकीय दृष्टीकोनातून जळगाव जिल्हा हा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. जिल्ह्यात जळगाव व एरंडोल असे दोन मतदार संघ होते.

त्यावेळी पश्‍चिम भागात जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव, भुसावळ, जामनेर, यावल, रावेर, मुक्ताईनगर (एदलाबाद) असे मतदार संघ होते. तर जळगाव पूर्व भागात एरंडोल मतदार संघ होता. त्यात एरंडोल, पारोळा, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा असे मतदार संघ होते. सन २००८ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली, त्यावेळी पूर्वीच्या एरंडोल मतदारसंघाला जळगाव जोडून हा जळगाव मतदार संघ करण्यात आला.

एरंडोल मतदारसंघातील चोपडा तालुका जोडून पूर्वीचा जळगाव लोकसभा हा रावेर मतदारसंघ करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघातील जनतेने देशातील राजकीय वाऱ्याची दिशेला नेहमीच जोखले असून त्याच दिशेने आपले मतदान केले आहे. अपवाद जळगाव लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उल्हास पाटील यांच्या विजयाचा आहे. (latest marathi news)

देशात भाजपला यश मिळालेले असतांनाही त्यावेळी जनतेने कॉंग्रेसचे उल्हास पाटील यांना खासदार म्हणून पाठविले मात्र त्यावेळी केवळ अठरा महिन्याच्याच कालावधी त्यांना मिळाला होता. कॉंग्रेस राजवटीत जळगावमधून वाय. एस. महाजन व एरंडोलमधून विजय नवल पाटील निवडून गेले तर जनता पक्षाच्या लाटेत जळगावमधून ॲड. वाय. एम. बोरोले तर एरंडोलमधून सोनुसिंग धनसिंग पाटील विजयी झाले.

पुन्हा कॉंग्रेसची लाट आली त्यावेळीही वाय. एस. महाजन व विजय नवल पाटील यांना संधी मिळाली. सन १९९७ मध्ये भाजप सेना युतीची लाट असतांना जळगाव लोकसभेतून गुणवंतराव सरोदे तर एरंडोलमधून विजय नवल पाटील यांना निवडून दिले. त्यानंतर एका पोटनिवडणूकीत एरंडोल मतदार संघातून ॲड वसंतराव मोरे यांना यश मिळाले होते.

जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघानी देशातील राजकीय वाऱ्याच्या दिशेने मतदान केले असले तरी जळगावचा पश्‍चीम भाग नेहमीच मंत्रीपदापासून वंचित राहिला आहे. पूर्व भागात असलेल्या तत्कालीन एरंडोल मतदार संघाला तीन वेळा केंद्रात मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. दहाव्या लोकसभा निवडणूकीत इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात विजय नवल पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रीपद त्यांना मिळाले होते. त्यानंतर सन १९७८मध्ये जनता पक्षाच्या मंत्रीमंडळात एरंडोल मतदारसंघातूनच निवडून आलेले सोनुसिंग धनसिंग पाटील यांना केद्रीय गृहराज्यमंत्रीपद मिळाले होते.

तर त्यांना सन १९९८ मध्ये केंद्रात भाजपचे अटलबिहारी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मंत्रीमंडळात एरंडोल मतदार संघातील एम.के.पाटील यांना ग्रामीण विकास राज्यमंत्रीपद मिळाले होते. जळगाव मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतरही जळगाव व रावेर मतदारसंघाने भाजपला साथ दिली आहे.

सन २०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जळगाव जिल्ह्याने साथ देत दोन्ही खासदार निवडून दिले परंतु यावेळी एकाही मतदारसंघाला संधी मिळाली नाही. जळगावचा पश्‍चिम भाग असलेल्या रावेर मतदारसंघातील रक्षा खडसे यांना दुसऱ्यांदा विजय मिळाल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र ती मिळाली नाही आणि जळगाव पश्‍चिम भागातील मतदार संघ आजही मंत्रीपदापासून उपेक्षितच राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT