Vanchit Bahujan Aghadi leader Adv. Prakash Ambedkar. esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : झटपट ‘ब्रेन वॉशिंग’चे पवारांकडे कोणते मशिन? : प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : भ्रष्टाचारी लोकांना भारतीय जनता पक्षात आणल्यानंतर स्वच्छ करण्याचे ‘वॉशिंग मशिन’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे भाजप विचारसरणीचा माणूस पंधरा दिवसांत ‘सेक्युलर’ विचारांचा करून त्याला पक्षाची उमेदवारी दिली जाते. (Jalgaon Lok Sabha Election)

झटपट ‘ब्रेन वॉशिंग’ करणारे कोणते मशिन शरद पवार यांच्याकडे आहे? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भुसावळ येथील जाहीर सभेत उपस्थित केला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शुक्रवारी (ता. ३) झालेल्या जाहीर सभेत ॲड. आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, की महाविकास आघाडीकडे आम्ही रावेरची जागा मागत होतो.

पण राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंसाठी ही जागा मागत होते. तेव्हाच मी त्यांना सांगितले, हा माणूस तुमच्याकडे राहणार नाही, हे गॅरंटीने सांगतो. शेवटी भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यावर सासरा विरोधात कसा उभा राहणार? राष्ट्रवादीने देखील निष्ठावंतांना उमेदवारी न देता पंधरा दिवसांत तीन पक्ष बदलणाऱ्याला उमेदवारी दिली. एकनाथ खडसे हुशार आहेत, त्यांचे राजकारण नीतिमत्तेचे नाही. (Latest Marathi News)

‘ते’ कार्यालय वसुलीचे

पंतप्रधान मोदींच्या कार्याचा समाचार घेताना आंबेडकर म्हणाले, की एक लाख शेतकऱ्यांनी हमीभावाच्या कायद्यासाठी दिल्लीत घेराव आंदोलन केले. त्या वेळी त्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी मोदी त्यांना भेटायला गेले नाहीत. सध्या ‘ईडी’च्या धाडी राजकारणी व मोठे कारखानदार यांच्यावर पडत आहेत.

पण लवकरच व्यापारी, शिक्षणमहर्षी यांच्यावरही त्या पडतील. पंतप्रधान यांचे कार्यालय मानवतेचे नव्हे, तर वसुलीचे कार्यालय झाले आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली. उमेदवार संजय ब्राह्मणे, प्रफुल्ल लोढा, वंदना सोनवणे, इब्राहिम तडवी, प्रा. डॉ. अनिल अंबरकर, अॅड. राजेंद्र भुंगरे पाटील आदींची या वेळी भाषणे झाली. आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमिभा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT