Jalgaon Lok Sabha Election esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : लोकसभा मतमोजणीची तयारी सुरू; मोजणीसाठी 14 टेबल

Lok Sabha Election : रावेर आणि जळगाव लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी १३ मेस झालेल्या मतदानाच्या मोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Lok Sabha Election : रावेर आणि जळगाव लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी १३ मेस झालेल्या मतदानाच्या मोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक लोकसभेच्या ६ विधानसभा क्षेत्रनिहाय १४ टेबल लावले जाणार आहेत. जळगाव शहरासाठी २५ तर विधानसभांसाठी १८ फेऱ्यांद्वारे मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Preparations for counting of Lok Sabha votes are underway )

मतमोजणीसाठी सहा विधानसभा क्षेत्रानुसार प्रत्येकी १४ टेबल लावले जातील. त्यासाठी तीन अधिकारी, मोजणी सहायक असे १६८ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जळगाव लोकसभेसाठी १४ उमेदवारांचे प्रत्येकी टेबलवर एक असे १४ तर रावेर लोकसभेसाठी २४ उमेदवारांचे २४ असे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील.

तीन प्रकारे मोजणी

तीन टप्प्यात मतमोजणी होणार असून पहिल्या टप्प्यात पोस्टल मतदान यात गृह मतदान (ज्येष्ठ दिव्यांग व्यक्तींचे होम वोटींग), निवडणूक कामी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान तर सैन्यदलातील सर्विस वोटर यात सर्वात जास्त मतदान पाचोरा तालुक्यात असून त्यांचे इटीपीबीएस याचे जळगावसाठी ६ तर रावेर ४ टेबलवर प्रथम स्कॅनिंग केले जाईल. पोस्टल मतदानात जळगावसाठी १२ तर रावेरसाठी १० टेबल असतील. (latest marathi news)

मतमोजणीसाठी देखील प्रत्येक ३ विधानसभा क्षेत्रासाठी एक असे ३ निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. डॉ.राहूल गुप्ता आणि अरूणकुमार झा यांच्यासह मुक्ताईनगर, जामनेरसाठी महेन्द्र पाल, अमळनेर चोपडा रावेर साठी अशोककुमार यांची तर निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार हे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पहाणार आहेत.

सुरक्षा यंत्रणा सज्ज

इव्हीएम मतदान यंत्रे व कंट्रोल युनिट स्ट्राँगरूमध्ये तसेच बाहेरीत परिसरात देखील सीसीटीव्हीसह अत्यंत कडकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. सद्यस्थितीत उष्णतामान पहाता कुलर वातानुलीत यंत्रांची तसेच पाणी, वीज आरोग्य अत्यावश्यक सुविधांची मतमोजणी ठिकाणी परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.

स्ट्राँगरूमकडे फक्त एकाच उमेदवाराची पाहणी

मतदानानंतर जळगाव आणि रावेर मधील विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान यंत्रे व साहित्य स्ट्रांगरूममध्ये कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी एका अपक्ष उमेदवाराव्यतिरिक्त अन्य कोणतेही उमेदवार वा त्यांचे प्रतिनिधी स्ट्राँगरूम परिसरात आले नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT