Jalgaon Lok Sabha Election : तालुक्यातील उत्तर भागातील सातपुडा पर्वतरांगेतील आदिवासी गावातील मतदानाची टक्केवारी वाढल्याचे चित्र होते.आदिवासी वाड्या, वस्ती, गावातील जनजागृती झाल्याने मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून येते. आदिवासी वाड्या वस्त्या, गावे येथील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. ()
जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या बोली भाषेतील पथ नाट्याद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली होती. तालुक्यांतील २७ आदिवासी गावात झालेले मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे -- गावाचे नाव व कंसात झालेले शेकडा मतदान
मोरचीडा (८०.४३)अंमलवाडी (७६.५२)
सत्रासेन (७०.४१)सत्रासेन (६६.८२)
उमरटी (७८.५०)गौऱ्या पाडाव (८१.९६)
खाऱ्या पाडाव (९२.५५)वैजापूर(६३.९५)
मुळ्यावतार(७३.७३)शेणपाणी (८८.२९)
कर्जाने(६४.६३)मेलाने(७१.६४)
मेलाने (६६.७९)मेलाने (८५.४३)
देव्हारी (६९.०८)देवझीरी(७५.०२)
लंगडाआंबा (७१.३४)उसमडी (८९.९०)
जामण्या (८४.२३)गाडऱ्या (८४.९४)
अंबापानी (७१.२७ )बोरमळी(७७.४२ )
मालापूर (७४.९७ )कुंड्यापाणी(८२.१३)
वाघजीरा(६७.४८)रुईखेडा (८०.४१)
हरीपुरा(७२.३३) असे २७गावांचा समावेश आहे. (latest marathi news)
सर्वात जास्त खाऱ्यापाडाव आदिवासी गावामध्ये ९३९ पैकी ८६९ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावून ९२.५५ टक्के मतदानाची विक्रमी नोंद झाली आहे. सर्वात कमी चोपडा शहरातील मतदान केंद्र क्रमांक १०५ मध्ये ९४१ पैकी केवळ ३८३ मतदारांनीच मतदान केल्याने सर्वात कमी टक्केवारी ४०.७० टक्के झाले आहे.तर त्यापेक्षा एक टक्क्याने वाढीव चहार्डी ता. चोपडा येथील मतदान केंद्र क्रमांक २३५ येथे १०९० मतदारांपैकी केवळ ४५१ मतदारांनी मतदान केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.