anil bhaidas patil vs umnesh patil esakal
जळगाव

Jalgaon Political News: जळगाव लोकसभेच्या जागेवार राष्ट्रवादीचा दावा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः लोकसभेचे रणशिंग फुंकले गेलेले आहे. त्यात कधीकाळी जळगाव लोकसभा मतदार संघावर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने दावेदारी सांगण्यास सुरुवात केली आहे.

रावेर आणि जळगाव या दोन मतदार संघांपैकी एक मतदार संघ आपल्याला मिळावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सक्रिय झालेली आहे. (Jalgaon Lok Sabha seat wise NCP claims anil bhaidas patil vs umnesh patil Political News)

जळगाव लोकसभा मतदार संघात पूर्वी राष्ट्रवादीचे प्राबल्य होते. सद्यस्थितीत आमदारांची तुल्यबळ स्थिती पाहता शिंदे गटाची सरशी या लोकसभा मतदार संघात आहे.

सहा पैकी तीन म्हणजेच पाचोरा, एरंडोल-पारोळा आणि जळगाव ग्रामीण हे तीन विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे आहेत.

तर जळगाव शहर आणि चाळीसगाव हे दोन विधानसभा मतदार संघ भाजपाकडे आहेत. विद्यमान खासदार जरी भाजपाचे असले तरी देखील भाजपाची स्थिती हवीतेवढी भक्कम नाही, ही वस्तुस्थिती आहे.

हे ओळखून राष्ट्रवादीने मतदार संघ मिळावा, अशी मागणी वरिष्ठ स्तरावर केली आहे. लोकसभा मतदार संघ गमावण्यापेक्षा तो मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला मिळायला हवा, अशी भूमिका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मांडत आहेत.

अनिल भाईदास पाटील यांच्या गळ्यात मंत्रीपदाची आणि नंदुरबारच्या पालकमंत्री पदाची माळ पडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

राष्ट्रवादीला लोकसभा निवडणूक लढवायची झाल्यास त्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत. जोमाने लढून पंतप्रधान मोदींना हातभार लावण्याची क्षमता जळगाव राष्ट्रवादीमध्ये असल्याचे नेते आणि कार्यकर्ते सांगू लागले आहेत. 

तथापि, गेल्या निवडणुकीत भाजपाकडून पराभूत झालेले माजी आमदार गुलाबराव देवकर हे लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. त्यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केलेले आहे.

विद्यमान आमदारांविरुद्ध असलेला रोष आपल्याला फायदा करुन देऊ शकतो, असा देवकरांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने लोकसभेसाठी दावेदारी केल्यास उमेदवार कोण असेल, याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत.

कॅबिनेट मंत्री असलेले अनिल भाईदास पाटील यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष आहे. जिल्हा पातळीवर कोणाच्या नावावर चर्चा होते, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपाकडून जागा खेचून घेण्यात राष्ट्रवादीला कितपत यश येते, यावर लोकसभेची समीकरणे अवलंबून असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT