Girish Mahajan, Raksha Khadse, Unmesh Patil ,Smita Wagh  esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election 2024 : रक्षा खडसेंना ‘सर्व्हे’चे बळ, स्मिताताईंना निष्ठेचे फळ!

Lok Sabha Election 2024 : खानदेशातील चारपैकी तीन जागांवरील उमेदवारांना ‘रिपीट’ करताना भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने त्या मतदारसंघांमधील ‘सर्व्हे’च्या निष्कर्षांचाच आधार घेतल्याचे दिसून येते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशातील चारपैकी तीन जागांवरील उमेदवारांना ‘रिपीट’ करताना भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने त्या मतदारसंघांमधील ‘सर्व्हे’च्या निष्कर्षांचाच आधार घेतल्याचे दिसून येते. तर, जळगाव मतदारसंघाबाबत गेल्या वेळी झालेली ‘चूक’ सुधारत स्मिता वाघांच्या निष्ठेला फळ दिल्याचे अधोरेखित होते. उमेदवारी नाकारल्याने उन्मेश पाटलांवर आत्मचिंतनाची वेळ आली, तर गिरीश महाजनांनी लोकसभा उमेदवारीच्या ‘फंद्या’तून स्वत:ची सुटका करुन घेतल्याचे यावरुन सांगता येईल. (Jalgaon Loksabha Election Raksha Khadse gets nomination through Survey and Smita Wagh gets candidature through loyalty)

लोकप्रतिनिधींबद्दल स्थानिक नेत्यांची अथवा पदाधिकाऱ्यांची नाराजी असणे, त्यातून नेतृत्वाला होणारे नकारात्मक ‘रिपोर्टिंग’ या गोष्टी किमान भाजपतील केंद्रीय नेतृत्व विचारात घेत नाही, उलटपक्षी पक्षाचा व खास करुन मातृसंस्था असलेल्या रा.स्व. संघाचा अंतर्गत सर्व्हेचा निष्कर्ष काय आहे, हाच प्रमुख निकष उमेदवारी देताना प्राधान्यक्रमाने पाहिला जातो, हा आजवरचा अनुभव. त्याचा प्रत्यय खानदेशातील व विशेषत: जळगाव जिल्ह्यातील उमेदवार जाहीर करताना दिसून आला.

रावेर : ‘सर्व्हे’च्या निष्कर्षानुसार

रक्षा खडसेंबद्दलच्या नाराजीचा प्रमुख घटक म्हणजे माजी मंत्री व भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात गेलेले त्यांचे श्‍वसूर एकनाथ खडसे. एकाच कुटुंबात दोन पक्षातील प्रतिनिधी असल्यानंतर कार्यकर्त्यांसह समर्थकांची वाटणीही होणारच. त्यामुळे खडसेंच्या समर्थकांना रक्षाताई बळ देतात, अशी त्यांच्याबद्दलची तक्रार.

गेल्या काळात जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसमोरही काहींनी तक्रारींचा पाढा वाचला. नाराजीचे हे घटक, कारणे विचारात घेऊनही भाजप व संघाच्या अंतर्गत सर्वेक्षणात रक्षा खडसेंबद्दलचा अहवाल अनुकूल होता. विशेष म्हणजे, उमेदवारीच्या प्राधान्यक्रमात त्या मंत्री गिरीश महाजन, व स्वत: एकनाथ खडसेंपेक्षाही एक गुण वरच होत्या. सर्व्हेच्या या निष्कर्षाचे बळच रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन गेले.

जळगाव : अंतर्गत कुरघोडीचा बळी

जळगाव लोकसभा मतदारसंघात २०१९मध्ये स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी त्यांचा पत्ता कापून चाळीसगावचे तत्कालीन आमदार उन्मेश पाटलांना तिकीट देण्यात आले.. पक्षाने श्रीमती वाघ यांच्या बाबतीत त्यावेळी केलेली चूक यावेळी सुधारली जाईल असे संकेत मिळत होते. (latest marathi news)

झालेही तसेच, आणि स्मिता वाघ भाजपच्या उमेदवार बनल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पाश्‍र्वभूमी व अनेक वर्षांपासून पक्षाची निष्ठेने सेवा करणाऱ्या कार्यकर्ती म्हणून त्यांची ओळख कामी आली. उन्मेश पाटलांचे तिकीट कापताना स्थानिक नेत्यांशी मतभेद, पक्षात अंतर्गत कुरघोडीचा ते बळी ठरल्याचे बोलले जात आहे. एकदा विधानसभा, एकदा लोकसभा.. आता पुढे काय? हा प्रश्‍न पाटलांसमोर आहे.

महाजनांनी स्वत:ला ठेवले दूर

एकेका जागेबाबत काळजी घेत असलेल्या भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने या वेळी राज्यातील मंत्री, दिग्गजांना लोकसभेच्या मैदानात उतरविण्याचे ठरवले. राज्यसभा सदस्य असलेले केंद्रीय मंत्री पियूष गोयल, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार ही त्यातील काही नावे. त्या यादीत गिरीश महाजनांचेही नाव होते. ‘रावेरमध्ये रक्षा खडसेंना उमेदवारी द्यायची नसेल तर तुम्ही लढा..’ असा निरोप महाजनांना मिळाला. पण, त्यांना दिल्लीत जायचेच नाही.. म्हणून त्यांनी रक्षा यांच्या नावाला विरोध न दर्शविता या फंद्यातून स्वत:ची सुटका करुन घेतल्याचीही चर्चा आहे.

कारवाईस स्थगिती, संभाव्य गुन्ह्याची पाश्‍र्वभूमी

दोन्ही मतदारसंघात काही दिवसांपूर्वी घडलेल्या, पण निवडणुकीशी संबंधित नसलेल्या घटनांची पाश्‍र्वभूमी या उमेदवारीमागे असल्याचे बोलले जात आहे. खडसे कुटुंबियांना गौण खजिनप्रकरणी १३७ कोटींच्या दंडाची नोटीस बजावण्यात आलीय, त्यात रक्षा खडसेंचेही नाव आहे. या कारवाईस अचानक गेल्या आठवड्यात स्थगिती मिळाली.

तर दुसरीकडे, उन्मेश पाटलांविरुद्ध छत्रपती संभाजीनगरातील पोलिस ठाण्यात जालन्याच्या उद्योजकाने फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे, त्यात अद्याप गुन्हा दाखल व्हायचा आहे.. या दोन्ही राजकीय घटना नसल्या तरी उमेदवारीवर परिणाम करणाऱ्या ठरल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT